Karanvir Bohra याने आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली गोड बातमी, पुन्हा एकदा होणार बाप होणार असल्याचे सांगत शेअर केला 'हा' खास फोटो
Karanvir Bohra Gud news (Photo Credits: Instagram)

टीव्ही अभिनेता करणवीर बोहरा (Karanvir Bohra) याच्या वाढदिवसानिमित्त आज त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता मात्र हा वर्षाव दुप्पट करण्यासाठी करणवीरने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या चाहत्यांना एक गूड न्यूज दिली आहे. करणवीर बोहरा आणि त्याची पत्नी टीजे (TJ) पुन्हा एकदा आई-वडिल होणार आहेत. करणवीरने आपल्या चाहत्यांसोबत ही न्यूज शेअर केली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर करणवीरने आपल्या पत्नीसह खास फोटो शेअर करुन ही गोड बातमी दिली आहे.

या फोटोमध्ये करणवीर आणि टिजे मातीला छान आकार देत लहान बाळाची मूर्ती घडविताना दिसत आहे. यात त्या दोघांच्या चेह-यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे असच दिसतय. करणवीर ला दोन जुळ्या मुली आहेत आणि आता हा नवा पाहुणा येणार असल्याने करणवीरचे कुटूंब आनंदून गेले आहेत.

हेदेखील वाचा- अभिनेता कुशल पंजाबी याची राहत्या घरी आत्महत्या; करणवीर बोहरा याने शेअर केली भावनिक पोस्ट

या फोटोमध्ये करणवीरचा शर्टलेस अंदाज आणि टीजे चा पांढ-या स्लिवलेस शर्टमधील अंदाज चाहते फार पसंत करत आहे. त्यात ही गूड न्यूज ऐकून आनंदी झालेल्या समीरा रेड्डी, गौहर खान, सुरभि ज्योति, ताहिरा कश्यम यांसारख्या सेलिब्रेटीजसह चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव करत खूप सा-या शुभेच्छा दिल्या आहेत.