Kapil Sharma-Ginni Chatrath Wedding: कपिल शर्मा १२ डिसेंबरला अडकणार लग्नाच्या बेडीत, लग्नाचं आमंत्रण शेअर करताना मागितली 'ही' खास भेट !
kapilsharma wedding card Photo Credit : twitter

Kapil Sharma Wedding Invitation Card : तुळशीच्या लग्न आटपलं की सर्वत्रच लग्नाचा मौसम सुरू होतो. मग बॉलिवूड आणि कलाकार मंडळीदेखील यापासून कशी दूर राहतील? रणवीर -दीपिका (DeepVeer), प्रियांका -निक (Nickyanka) , ईशा अंबानी - आनंद पिरामल पाठोपाठ आता कॉमेडी किंग कपिल शर्मा (Kapil Sharma) देखील लग्नबंधनात अडकणार आहे. कपिल शर्मा त्याची गर्लफ्रेंड गिन्नी चतरथसोबत (Ginni Chatrath) लग्न करणार आहे. कपिल शर्माने (Kapil Sharma)  त्याचं वेडिंग कार्ड शेअर केलं असून चाहत्यांकडे आशीर्वाद मागितले आहेत.

अनेक दिवसांपासून नैराश्याच्या गर्तेमध्ये अडकलेला कपिल शर्मा( Kapil Sharma) आता पुन्हा चाहत्यांसमोर यायला सज्ज झाला आहे. आजच कपिल शर्मा टेलिव्हिजनवर कमबॅक करत असलेल्या ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे करियर आणि वैयक्तिक आयुष्यातील घडी पुन्हा व्यवस्थित बसायला सुरूवात होणार आहे.

गिन्नी आणि कपिल शर्मा ही जोडी जालंधरमध्ये  12 डिसेंबरला विवाहबद्ध होणार आहेत. कपिल शर्मा गिन्नीला केवळ प्रेयसी म्हणून नाही तर एका व्यक्ती म्हणूनदेखील तिचा खूप आदर करतो. गिन्नी नेहमीच योग्य निर्णय घेते म्हणून तिचा सन्मान राखत असल्याचेही कपिल शर्माने सांगितले आहे.