सोनी टीव्ही वरील लोकप्रिय रियालिटी शो 'इंडियन आयडल 11' (Indian Idol 11) या स्पर्धेचा विजेता कोण होणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. सोनी टीव्हीने विजेता घोषित केला असून सनी हिंदुस्तानी (Sunny Hindustani) इंडियन आयडल 11 होण्याचा मान पटकवला आहे. तर मराठमोळा रोहित राऊत (Rohit Raut) फर्स्ट रनरअप ठरला आहे. सनी हिंदुस्तानी, रोहित राऊत, अनकोना मुखर्जी, अद्रिक घोष आणि रिधम कल्याण हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत दाखल झाले होते. विजेता सनी हिंदुस्तानी याला टी-सिरीजच्या आगामी सिनेमात गाण्याची संधी मिळेल.
ऑक्टोबर 2019 मध्ये सुरु झालेल्या 'इंडियन आयडल 11' या शो चा अंतिम सोहळा अगदी दिमाखदार होता. या अंतिम सोहळ्यात नेहा कक्कड, आदित्य नारायण, आयुष्मान खुराना आणि इतर स्पर्धकही सहभागी झाले होते. अंतिम सोहळा धमाकेदार परफॉर्मन्सने नटलेला होता. त्याचबरोबर कृष्णा अभिषेक आणि भारती सिंह या विनोदवीरांनी कार्यक्रमाला रंगत आणली. (इंडियन आयडल 11 च्या TRP साठी पसरवल्या नेहा कक्कड आणि आदित्य नारायण यांच्या लग्नाच्या खोट्या बातम्या; उदित नारायण यांचा धक्कादायक खुलासा)
Sony TV Tweet:
The #IndianIdol11 title goes to #SunnyHindustani.
Congratulations @sunny_singer11#IndianIdolGrandFinale pic.twitter.com/ESzXxKznae
— Sony TV (@SonyTV) February 23, 2020
कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी विजेता सनी पूर्वी बुट पॉलिश करत असे. मात्र आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने त्याने 'इंडियन आयडल 11' चा किताब आपल्या नावे केला. या अंतिम सोहळ्यात आयुष्मान खुराना, नीना गुप्ता आणि गजराज राव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.