Pratik Shah and Hruta | PC: Instagram

सध्या लगीनसराई सुरू आहे. अनेकजण विवाहबंधनात अडकत आहेत आणि कलाकार मंडळी देखील त्याला अपवाद नाहीत. 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) देखील लवकरच बॉयफ्रेंड प्रतिक शाह (Pratik Shah) सोबत असलेलं तिचं रिलेशनशीप पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत मिळाले आहेत. नुकताच ह्र्ताने प्रतिकसोबतचा एक फोटो शेअर करत हॅशटॅग मध्ये 'फक्त 8 दिवस बाकी' असं लिहल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

हृता आणि प्रतिक साखरपुडा करणार, लग्न करणार की कोणत्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार याबाबतची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. काही दिवसांपूर्वीच हृताने प्रतिक सोबत असलेल्या रिलेशनशीपची कबुली दिली आहे. पण आता लग्न, साखरपूडा याबाबत मात्र खुलासा केलेला नाही. नुकत्याच पार पडलेल्या लोकमतच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रतिक आणि हृता यांनी एकत्र हजेरी लावली होती. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये लग्न मुंबई मध्ये होईल आणि ते 2022 मध्ये महाराष्ट्रीय स्टाईल ने आणि वैदिक पद्धतीने करण्याचा मानस असल्याचं हृताने सांगितलं आहे.

हृताची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta (@hruta12)

हृता दुर्गुळे सध्या 'मन उडू उडू ..' मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. सोबतच उमेश कामत सोबत 'दादा एक गूड न्यूज आहे' या नाटकाचेदेखील प्रयोग विकेंडला करत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने रवी सोबतही चित्रपटाचं शूटिंग केले आहे. तर प्रतिक शाह हा अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने दएखील हिंदी मालिकेच्या निर्मात्याची, दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. मुग्धा शाह यांच्यासोबत 'दुर्वा' मालिकेत काम करताना पहिल्यांदा हृता आणि प्रतिकची भेट झाली होती. नंतर त्यांचं रिलेशनशीप सुरू झालं आहे.

आता 24,25 डिसेंबरला हृता नेमकी कोणती बातमी देतेय याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.