एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म निर्मित लोकप्रिय मालिका 'कुमकुम भाग्य' (Kumkum Bhagya) च्या सेटवर आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या सेट बाहेरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रीकरण सुरु असताना शॉक सर्किट झाल्याने ही आग लागली. मात्र, या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
कोरोना संकटामुळे मनोरंजन क्षेत्रातील चित्रीकरण थांबवण्यात आलं होतं. परंतु, त्यानंतरच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तसेच विविध अटींची पुर्तता करून चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली. मात्र, आज कुमकुम भाग्य मालिकेचे चित्रीकरण सुरू होताचं सेटवर आग लागली. या आगीमुळे चित्रीकरण त्वरीत थांबवण्यात आलं आहे. (हेही वाचा - मालिका, चित्रपटांच्या चित्रीकरणसंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या 'या' निर्णयावर जेष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ नाराज)
View this post on Instagram
एकता कपूर निर्मित ‘कुमकुम भाग्य’ मालिका सर्वात लोकप्रिय मालिका आहे. यात सृती झा आणि शब्बीर अहलूवालिया यांची मुख्य भूमिका आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक मालिकांना मोठा फटका सहन करावा लागला होता.