Bengali Actress Suchandra Dasgupta Died: बंगाली मनोरंजन उद्योगातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. बंगाली टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ता (Suchandra Dasgupta) यांचे रस्ते अपघातात निधन झाले. अभिनेत्रीच्या निधनामुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या निधनाच्या बातमीने तिचे चाहतेही दु:खी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुचंद्रा शूटिंगवरून घरी परतत होती. घरी परतण्यासाठी त्यांनी अॅपच्या माध्यमातून बाईक बुक केली होती. मात्र वाटेत एक दुचाकीस्वार व्यक्ती रस्ता ओलांडत असताना अचानक मध्यभागी आला. दुचाकी चालकाने अचानक ब्रेक लावला असता मागून एका लॉरीने दुचाकीला धडक दिली. (हेही वाचा - Bharat Jadhav on Ratnagiri Theatre: अभिनेता भरत जाधव रत्नागिरीत पुन्हा करणार नाही नाटकाचा प्रयोग, नाट्यगृहाच्या स्थितीवरुन नाराजी, प्रेक्षकांचीही मागितली माफी)
या धडकेनंतर 29 वर्षीय अभिनेत्री सुचंद्रा दुचाकीवरून खाली पडली आणि मागून येणाऱ्या ट्रकने तिला चिरडले. यात अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही काळ वाहनांची वाहतूकही विस्कळीत झाली होती. त्यानंतर बारानगर पोलिसांनी अपघातस्थळी पोहोचून परिस्थिती सुरळीत केली. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक चालकालाही ताब्यात घेतले आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे बंगाली चित्रपट जगतात शोककळा पसरली आहे.
बंगाली टेलीविजन एक्ट्रेस सुचंद्र दासगुप्ता (#SuchandraDasgupta) का शनिवार रात कोलकाता (#Kolkata) के उत्तरी बाहरी इलाके बारानगर में एक सड़क दुर्घटना में निधन हो गया। वह शूटिंग समाप्त कर मोटरसाइकिल से घर लौट रही थी, जब वह एक तेज रफ्तार ट्रक की चपेट में आ गई। pic.twitter.com/cpumnYmehY
— IANS Hindi (@IANSKhabar) May 21, 2023
सुचंद्रा दासगुप्ता बंगाली टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. त्यांनी अनेक प्रसिद्ध बंगाली टेलिव्हिजन शोमध्ये काम केले. 'गौरी'मध्ये सहाय्यक भूमिका साकारून त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. अभिनेत्रीची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.