He Mann Baware Team| Photo Credits: Instagram

‘हे मन बावरे’ (He Mann Baware) या कलर्स मराठी वरील मालिकेने निरोप घेतला आहे. मात्र अजूनही काही कलाकारांचे मानधन थकले असल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियामध्ये वायरल होत आहे. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत, मृणाल दुसाणीस आणि अभिनेता संग्राम समेळ, विधिषा म्हैसकर यांनी आज इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करत त्यांना अद्याप त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नसल्याचं सांगत मालिकेचा निर्माता मंदार देवस्थळीला याचा जाब विचारला आहे. सकाळपासून या कलाकारांच्या पोस्ट वायरल झाल्यानंतर मंदारनेही सोशल मीडियामधून त्यांच्याकडे थोडा वेळ मागितला आहे. दरम्यान कलाकारांनी त्यांच्या मेहनतीचे पैसे मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

काय आहे कलाकारांची पोस्ट?

नमस्कार!

आम्ही कलाकार चॅनल कोणतही असो निर्माता कोणीही असो आम्ही कलाकार नेहमी च आपल्याकडुन चांगलं काम व्हावं या हेतूने मेहनत घेत असतो. उत्तम काम आणि ते केल्यावर त्याचा योग्य मोबदला हाच हेतू असतो आणि तो असावा. पण काम करुनही त्याचा पैसा वेळेवरच न मिळणे, योग्य आहे? अनेक वेळा अस होत कि आपण खूप प्रामाणिक पणे आपले

काम(शुटिंग) करतो.. आपल प्रोजेक्ट हे आपल बाळ आहे आणि प्रोडक्शन हाऊस हे आपल घर

नस समजून वेळेची, परिस्थितीशी, घरच्यांशी, प्रोडक्शन हाऊस कडून न मिळणाऱ्या गोष्टींशी, प्रोडक्शनहाऊस च्या Missmanagement शी adjustment करून सर्व तंत्रज्ञ आणि कलाकार अविरत काम करत असतात.. चॅनल चा उत्तम सपोर्ट असूनही निर्माता कामाचा योग्य तो

मोबदला देत नाहीत.. अनेक कारणं वारंवार मिळतं असतात.. ...आम्ही मात्र निर्माता जगला तर कलाकार जगला ह्या तत्वांतर्गत काम करत असतो.. मग वेळच्या वेळी चॅनलकडून पैसे येवून पण कलाकारांना आणि तंत्रज्ञानांना पैसे निर्मात्याकडून न मिळण

हे योग्य आहे का? कलर्स मराठीने आम्हा कलाकारांना, तंत्रज्ञांनाना वेळोवेळी पैसे मिळवून

देण्यासाठी मदत केली परंतु आमच्या निर्मात्याने कोणालाही पैसे दिले

नाही.. निर्मात्याच्या अडिअडचणींच्या वेळेस, episodes ची Bank नाही

म्हणून किंवा कधी कधी निर्मात्यांकडे costumes नाही म्हणून घरून

आपले costumes आणून शूटिंगचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मदत

करणे आता चुक आहे का?

आपल्याच मेहनतीचा हक्काचा पैसा मोबदला भिक मागीतल्या सारखा

सतत मागत रहाणे हे योग्य आहे का?

दरम्यान हीच सारखी पोस्ट शर्मिष्ठा राऊत, मृणाल दुसानीस, संग्राम समेळ यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

शर्मिष्ठा राऊत पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharmishtha Raut (@sharmishtharaut)

मंदार देवस्थळीची प्रतिक्रिया

दिग्दर्शक मंदार देवस्थळीने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मला माहित आहे माझ्याकडून पैसे थकले आहेत. पण मी लवकरच ते परत करेन. मला थोडा वेळ द्या. कोणाचे पैसे बुडवण्याची माझी इच्छा नाही. हे पैसे टॅक्स सह परत करणार असल्याचं त्यांनी म्ह्टलं आहे. माझ्यावर सुद्धा आर्थिक संकट कोसळलं आहे. मी वाईट माणूस नाही परिस्थिती वाईट आहे. पण यातूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं मंदार देवस्थळी यांनी इंस्टाग्राम पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

मंदार देवस्थळी हा टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्याने वादळवाट, आभाळमाना,होणार मी सून या घरची यासह अनेक लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.