दूरदर्शनवरील टीव्ही शो रामायण (Ramayana) पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्यामुळे नागरिक सध्या लॉकडाउनच्या काळात खुश आहेत. या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने पुन्हा जिंकली असून त्याने जागतिक रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तसेच रामायण जेव्हापासून पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली आहे तेव्हापासून टीआरपीने सुद्धा रेकॉर्ड मोडले आहेत. याच दरम्यान, माता सीतेची भुमिका साकारणारी दीपिका चिखलीया (Dipika Chikhalia हिने आता भारत सरकराने रामायणाच्या टीमला पद्म पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी केली आहे. तसेच रामायणाच्या कार्यक्रमासाठी रॉयल्टीची (Royalty) सुद्धा मागणी केली आहे.
दीपिका हिने असे म्हटले आहे की, या बातचीत मध्ये कोणी अवॉर्ड मागत नाही आहे. मात्र मी यावर अधिक लक्ष देणार आहे. ज्या प्रकारे मोदी सरकारने रामायण कार्यक्रम दुनियेच्या समोर पुन्हा आणल्याने आम्हाला खुप प्रेम मिळत आहे. मात्र आता रामायणाच्या टीमने संस्कृति आणि साहित्य क्षेत्रात काही काम केले असे मोदी यांना वाटत असल्यास त्यांनी आम्हाला सुद्धा पद्म पुरस्कारने सन्मानित करावे.(Sri Krishna on Doordarshan On Air Time & Schedule: दूरदर्शन वर उद्या पासून 'या' वेळात अवतरणार श्रीकृष्ण! प्रकाश जावडेकर यांचे ट्विट)
रॉयल्टी बाबत दीपिका हिने असे म्हटले आहे की, आमच्या या योगदानासाठी आम्हाला कोणताच सन्मान मिळाला ना कोणतीही रॉयल्टी सुद्धा मिळाली आहे. आज मी गोष्ट सांगते आहे कारण लोक आम्हाला ऐकत आहेत. आम्हाला यासाठी उत्तम रॉयल्टी मिळाली पाहिजे. दीपिका हिने पुढे असे ही म्हटले आहे की, या कार्यक्रमात काम केल्याचे किती पैसे दिले जातात हे लोकांना सांगताना सुद्धा लाज वाटत असे. परंतु प्रत्येक कलाकारने आपली भुमिका योग्य परिने साकारण्यासाठी खुप मेहनत केली.
प्रेक्षकांना आमच्यात देवाचे रुप दिसायचे. आम्ही कलाकारांनी कधीच पैशांच्या उद्देशाने यावर काम केले नाही. आज मला जे सांगायचे आहे ते ऐवढ्यासाठीच की मला कधी कोणताही राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कार सुद्धा मिळाला नाही आहे.