Dilip Joshi Birthday Special: तारक मेहता.. मधील जेठालाल फेम दिलीप जोशी बद्दल काही खास गोष्टी
दिलीप जोशी (Photo Credits: Facebook)

एखाद्या कलाकाराची ओळख त्याच्या मूळ नावापेक्षा त्याच्या पात्राच्या नावाने होणं आणि वर्षानुवर्ष ती टिकणं हे भाग्य क्वचितच काहींच्या वाट्याला येतं. पण असा एक भाग्यवान कलाकार म्हणजे दिलीप जोशी (Dilip Joshi) . तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेमध्ये दिलीप जोशी ची ओळख जेठा लाल (Jethalal Gada) आहे. आणि आता आबालवृद्धांच्या मनावर दिलीप जोशी जेठा लाल म्हणूनच राज्य करत आहे. 13 वर्ष तो जेठा लाल साकरत आहे. आज याच जेठालाल म्हणजे दिलीप जोशीचा 53 वा वाढदिवस आहे. सिनेमा, मालिका मधून रसिकांच्या मनात विशेष जागा मिळवलेल्या या दिलीप जोशी बद्दल जाणून घ्या आज त्याचा वाढदिवसानिमित्त खास गोष्टी

दिलीप जोशी बद्दल खास गोष्टी

  • दिलीप जोशी यांचा जन्म गुजराती कुटुंबामध्ये झाला आहे. त्यांनी जयमाला जोशी यांच्यासोबत केले आणि आता ते 2 मुलांचे पिता देखील आहेत.
  • दिलीप जोशी हे सलमान खानच्या मैने प्यार किया, हम आपके है कौन मध्ये झळकले होते. त्यांनी बॉलिवूड मध्ये एकूण 15 सिनेमे केले आहेत. नक्की वाचा: तारक मेहता का उल्टा चश्मा च्या जेठालालची इंस्टाग्राम वर एंट्री; अभिनेता दिलीप जोशी यांनी केली 'ही' पहिली पोस्ट.

  • दरम्यान तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये दिलीप जोशी यांना सुरूवातीला जेठालाल गडा च्या वडिलांचं म्हणजे चंपकलाल गढा हे पात्र विचारण्यात आलं होतं. मात्र त्यांनी ते नाकारलं आणि नंतर त्यांच्यासमोर जेठालाल गढा या पात्रासाठी ऑफर आली आणि ती त्यांनी स्वीकरली.
  • जनसत्ताच्या रिपोर्ट्सनुसार दिलीप जोशी यांची आवडती कार ब्लॅक ऑडी क्यू 7 आहे. ही अंदाजे 80 लाखांची गाडी आहे. यासोबतच 14 लाखांची इनोवा देखील दिलीप जोशी कडे आहे.
  • दरम्यान तारक मेहता मध्ये दिलीप जोशी हा सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार आहे. त्यांना प्रत्येक एपिसोडला दीड लाख मिळतात असे रिपोर्ट्स सांगतात. त्यामुळे जर हे खरं असेल तर त्यांचं मासिक उत्पन्न 45 लाखांच्या जवळ आहे.

काही वर्षांपूर्वी गरोदरपणामुळे तारकमेहता मालिकेची प्रमुख नायिका दिशा वाकनी अर्थात दया बेन मालिकेपासून दूर गेल्यानंतर आता दिलीप जोशी अर्थात जेठालाल या मालिकेचा कणा बनला आहे.