Bigg Boss 14:  सलमान खान चा शो, बिग बॉस च्या येत्या सीझन मध्ये स्पर्धक म्हणुन येणार राधे माँ?
Radhe Maa, Salman Khan (Photo Credits: Instagram)

'बिग बॉस चा सीजन 14' (Bigg Boss 14) लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचा एक नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे. '2020 मध्ये मनोरंजनाचा सीन पलटणार' असं सलमान खान (Salman Khan) ने प्रोमो मध्ये सांंगितलं होतं पण तुम्ही कल्पनाही केली नसेल असा धमाका या सीझन मध्ये येण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावरील चर्चा व टेलिचक्कर या वेबसाईटच्या अनुसार वादग्रस्त स्वयंघोषित गॉडवुमन राधे मॉं (Radhe Ma)  या सीझन मध्ये स्पर्धक म्हणुन सहभागी होईल अशी शक्यता आहे. यापुर्वी सुद्धा अनेकदा या शो कडुन राधे मॉं ला स्पर्धक म्हणुन येण्यासाठी विचारणा झाली होती मात्र या सीझन साठी राधे मॉं ने अगोदरच होकार दिल्याचे म्हंंटले जातेय. Bigg Boss 14: 'बिग बॉस 13' चा विजेता सिद्धार्थ शुक्ला सीजन 14 साठी नाव आले समोर? जाणून घ्या सविस्तर

आपण बिग बॉस चे मागचे सीझन फॉलो केले असतील तर प्रत्येक सीझन मध्ये कलाकारांंच्या सोबतच एकतरी अशी हटके सेलिब्रिटी असतेच हे आपण जाणून असाल. 10व्या सीझन मध्ये स्वामी ओम हे नाव सुद्धा असेच प्रसिद्ध झाले होते. त्याच प्रमाणे आता यावेळेस राधे मां शो मध्ये पाहायला मिळु शकते. राधे मां म्हणजेच सुखविंंदर कौर हे एक विवादित नाव आहे त्यांंनी स्वतःला देवी म्हणुन घोषित केले आहे. त्यांंच्यावर हुंडा घेण्यापासुन ते ब्लॅकमेलिंग पर्यंंत अनेक आरोप आहेत.

दरम्यान यंंदाच्या सीझन मध्ये निशांत मल्कानी, पर्ल वी पुरी, जैस्मिन भसीन, निया शर्मा, शिरीन मिर्जा, सुगंधा मिश्रा, मानसी श्रीवास्तव, शांतिप्रिया, साक्षी चोपड़ा, पवित्रा पूनिया आणि निखिल चिनप्पा असे सेलिब्रेटी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र अर्थातच नियमानुसार शो सुरु होई पर्यंंत याची अधिकृत घोषणा होत नाही त्यामुळे खरंं काय हे पाहण्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे.