Bigg Boss 14: 'बिग बॉस 13' चा विजेता सिद्धार्थ शुक्ला सीजन 14 साठी नाव आले समोर? जाणून घ्या सविस्तर
Siddharth Shukla (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) एक महिना लांबणीवर गेलेल्या 'बिग बॉस 14' (Bigg Boss 14) या शो चे चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. नुकताच या शोचा प्रोमो समोर आला. त्यानंतर चाहत्यांमध्ये या शो ची उत्सुकता आणखीनच वाढली. मिडिया रिपोर्टनुसार, या शो बद्दल आलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, या शोमध्ये मागील वर्षीच्या विजेता सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) याला अप्रोच करण्यात आले होते. हे ऐकून अनेकांना धक्काच बसला. तर सिद्धार्थच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असू शकते.

'द खबरी' ने एका ट्विटर हँडलवर सोशल मिडियावर पोस्ट करत सांगितले आहे की, 'सिद्धार्थला सुरुवातीच्या आठवड्यात बिग बॉस 14 च्या घरात एन्ट्री करण्यासाठी अप्रोच करण्यात आले आहे. शो च्या सुरुवातीच्या एपिसोड्समध्ये मनोरंजनाचा डोस वाढविण्यासाठी सिद्धार्थला या शो मध्ये पाहुणा स्पर्धक म्हणून ऑफर करण्यात आले आहे.' Bigg Boss 14 New Promo: बिग बॉस 14 च्या प्रोमो मधून सलमान खान ने 2020 मनोरंजनाचा सीन पलटण्याचा केला दावा, Watch Video

दरम्यान असे सांगण्यात येत आहे की, बिग बॉस 14 मध्ये लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंग अशी थीम ठेवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma), व्हिव्हियन डीसेना (Vivian Dsena) आणि शेखर सुमन (Adhyayan Suman) यांचा मुलगा अध्यायन सुमन यंदाच्या पर्वामध्ये दिसू शकतात. ईटाइम्सच्या अहवालानुसार सुष्मिता सेनचा भाऊ अभिनेता राजीव सेन याच्याशी देखील या बिग बॉस सीजन 14 साठी संपर्क साधण्यात आला आहे. राजीव आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. याशिवाय शुभांगी अत्रे, सुरभी जोशी असे कलाकारही यंदाच्या सिझनचा हिस्सा होऊ शकतात.