मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय रिअल लाईफ जोडी म्हणजे उमेश कामत (Umesh Kamat) आणि प्रिया बापट (Priya Bapat). या जोडीची लव्ह स्टोरी सुरु झाली तेव्हा ते मराठी टेलिव्हिजनवरील सुपरहिट ठरलेली आभाळमाया ही मालिका एकत्र करत होते. त्या आधी त्यांनी 'भेट' हा सिनेमा देखील एकत्र केला परंतु, त्याचा एकही सीन एकत्र नसल्याने त्यांची भेट काही झाली नाही. परंतु, आभाळमाया मालिकेदरम्यान या दोघांमधील प्रेम फुललं आणि अखेर दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
उमेश आणि प्रिया, दोघंही नेहमीच कपल गोल्स सेट करत असतात. सोशल मीडियावरील PDA पासून ते एकमेकांसोबत स्पेंड केलेल्या गोड क्षणांचे सर्व अपडेट्स ते आपल्या फॅन्सना देत असतात.
याही वेळी या कपलने एक फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत फॅन्सना तो कुठे क्लीक केला आहे असा प्रश्न विचारला. उमेशने हा फोटो शेअर करताना Guess? असं लिहिलं तर प्रियाने 'लवकरच' असं कॅप्शन लिहिलं. फॅन्सनी ओळखायचा खूप प्रयत्न केला आहे. परंतु, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हा फोटो नक्की कुठे क्लीक केला आहे.
प्रिया आणि उमेश या जोडीने नुकतंच Colors Marathi या वाहिनीवरील 'दोन स्पेशल' या शोमध्ये हजेरी लावली होती. हा भाग आज आणि उद्या प्रदर्शित होणार असून प्रिया आणि उमेश यांची लव्ह स्टोरी यात ऐकायला मिळणार आहे. तसेच होस्ट जितेंद्र जोशी यांच्याशी गप्पा मारताना दोघंही त्यांच्यातील किस्से सांगत गोड आठवणींना उजाळा देणार आहेत.