सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर (Phulwa Khamkar) हिने सोशल मिडियावर आपल्यााला आलेला कोरोनाचा भयाण अनुभव सांगितला आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढत असून कोरोनाची ही दुसरी लाट खूपच वेगाने आणि गेल्या वर्षीपेक्षा अधिक शक्तिशाली बनून आली आहे, असे तिने आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. मागील वर्षी त्यांच्या घरी कोरोनाने शिरकाव केला होता. मात्र तेव्हा त्याची झळ जितकी पोहोचली आहे त्याच्यापेक्षा जास्त यावर्षी जाणवतेय. तिचे अत्यंत लाडके छोटे काका जेव्हा व्हेंटिलेटरवर गेले तेव्हा असे तिने आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. एवढी मोठी सेलिब्रिटी असूनही तिच्या काकांना जेव्हा बेड मिळाला नाही, तेव्हा "कोरोना पैसे आणि ओळख या घटकांना ओळखतच नाही" असेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
"माझा हा सगळा आव आता गळून पडला आहे.... हवं ते हॉस्पिटल सोडा पण आपल्याला साधा बेड मिळत नाही म्हणजे काय, टीव्ही वर जे सतत सांगत आहेत की ऑक्सिजन बेड सुद्धा उपलब्ध नाहीये म्हणजे काय, व्हेंटिलेटर उपलब्ध नाही म्हणजे काय हे सत्य खाडकन थोबाडीत मारल्यासारख समोर उभं राहिलं आणि अगदी आपल्या घरापर्यंत आलं" असं तिने आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे.हेदेखील वाचा- 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड याने मास्क योग्यरित्या न वापरल्यास कसे मृत्यूला कवटाळाल हे फोटोमधून नागरिकांना समजावण्याचा केला प्रयत्न, See Pic
फुलवा पुढे म्हणते, "कोविड-19 सुद्धा आपल्याला खूप काही शिकवून जातोय ही वस्तुस्थिती आपण बदलू शकणार नाही. पैसे आणि ओळख या घटकांना करोना ओळखतच नाही.... करोना ने communism म्हणजेच साम्यवाद परत आणलाय हे ही तितकंच खरं. कोविड 19 सर्वांना समान लेखतो आहे.लहान मोठं,गरीब श्रीमंत,जात धर्म त्याच्या खिजगणतीत नाहीये...माणसाला तो फक्त माणूस म्हणून बघतो.... आपल्यातीलअनेकांना ही पण एक त्याच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट!!!"
"काका ला बी एम सी कोविड सेंटर मध्ये बेड मिळाला तेव्हा टाकलेला सुस्कारा मी कधीच विसरणार नाही.त्याला वाचवण्याची शर्थ करत असलेले आपले डॉक्टर.... अनेक पेशंट पैकी एक असलेल्या माझ्या काका साठी झगडणारे आपले सरकारी डॉक्टर्स,बी एम सी आणि आपली महाराष्ट्र सरकारची सिस्टीम यांना आज पुन्हा एकदा मानाचा मुजरा!!" असे म्हणत तिने राज्य सरकारचे आभार मानले आहे. तसेच "कोविड योद्धा आपण आपण जिवंत राहावं म्हणून चाललेले त्यांचे प्रयत्न ते अजिबात ना सोडता सातत्याने करत आहेत.... त्यांच्याबद्दल कृतज्ञता ठेवायची असेल तर काही दिवस शांतपणे आपापल्या घरात बसा" असा महत्त्वाचा संदेश तिने आपल्या पोस्ट शेवटी दिला आहे.