कुशल बद्रिके याने आपल्या कुटूंबासमवेत Coronavirus वर रचले भारूड, लोककलेच्या माध्यमातून केली जनजागृती
Kushal Badrike (Photo Credits: Instagram)

कोरोनाशी (Coronavirus) चार हात करण्यासाठी आणि आपल्या देशातून कोरोनाला पळवून लावण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. देशातील तमाम डॉक्टर, परिचारिका, पोलीस, प्रशासन या सर्वांचा प्रयत्नांना यश येण्यासाठी सर्व दिग्गज नेते, कलाकार मंडळी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करत आहे. त्यात 'चला हवा येऊ द्या' फेम कुशल बद्रिके (Kushal Badrike) याने आणि त्याच्या कुटूंबियांनी खारीचा वाटा उचलत या जनजागृतीत सहभाग घेतला आहे. राज्यात संचारबंदी लागू होऊनही लोक सर्रासपणे रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहे. त्यामुळे अशा लोकांनाही भारूडाच्या माध्यमातून लोकांच्या अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे.

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायजर चा वापर करा असा संदेश ही भारूडाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. कुशल बद्रिके, त्याची पत्नी आणि मुलगा या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

पाहा हे सुंदर भारूड

 

View this post on Instagram

 

@sunayana_badrike_kathak @jogpushkar @vijumaneofficial @zeemarathiofficial #कforcreative

A post shared by Kushal Badrike official (@badrikekushal) on

हेदेखील वाचा- कुशल बद्रिके याने कुटूंबांसोबत गायलेले 'Go Coronia' हे भन्नाट गाणे तुम्ही ऐकले का? मोकळ्या वेळेत घरी Creativity करण्याचा चाहत्यांना दिला सल्ला

काही दिवसांपूर्वी कुशलने आपल्या कुटूंबियांसोबत 'Go Coronia' या गाण्याचा व्हिडिओ तयार केला होता. घरात बसून आपल्या कुटूंबियांसोबत वेळ घालवा आणि आपल्या क्रिएटिव्हिटीला वाव देऊन असे काही तरी भन्नाट गोष्टी करुन मला टॅग करा असे त्याने या पोस्ट खाली लिहिले आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 147 वर पोहचला आहे. हे चित्र भीतीदायक आणि चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान महाराष्ट्रात कोरोनामुक्त होणार्‍यांचेही प्रमाण पुढील काही दिवसांत वाढेल असा आशावाद राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. आज सकाळी नागपूर मध्ये 5 नवे रूग्ण आढळले होते. विदर्भातील गोंदियामध्ये 1 तर नागपूर मध्ये 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.