Youtuber Carry Minati will not Enter Bigg Boss 14 House: यूट्यूबर कॅरी मिनाटी ने फेटाळलं बिग बॉस 14 मध्ये सहभागी होण्याबाबत चं वृत्त; ट्वीट च्या माध्यमातून माहिती
कैरी मिनाटी (Photo Credits: Instagram)

मागील काही महिन्यांपासून सोशल मीडीयामध्ये धूम करणारा युट्युबर कॅरी मिनाटी (Youtuber Carry Minati) आता सलमान खानच्या ' बिग बॉस 14' (Bigg Boss 14) मध्ये दिसणार अशी चर्चा होती. मात्र या वृत्ताचं स्वतः कॅरीने ट्वीटच्या माध्यमातून खंडन केले आहे. ट्वीट मध्ये त्याने 'मी बिग बॉसच्या घरात प्रवेश करत नाही आहे, तुम्ही जे वाचत आहात त्यावर विश्वास ठेवू नका'. दरम्यानकॅरी मिनाटी याचं खरं नाव अजय नागर (Ajey Nagar) आहे. CarryMinati on Bigg Boss 14 Funny Memes and Jokes: कॅरी मिनाटी सलमान खान च्या बिग बॉस शो मध्ये सहभागी होण्याची माहिती मिळताच चाहत्यांकडून सोशल मीडियावर फनी मीम्स आणि जोक्सचा वर्षाव!

कॅरी मिनाटी च्या ट्वीटच्या रिप्लाय मध्ये युट्युबर भुवन बम (Bhuvan Bam) ने देखील प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे, 'तू पुढल्या वर्षी देखील जाशील. जसा मी मागील 4 वर्ष जात आहे.'

कॅरी मिनाटी ट्वीट

काही महिन्यांपूर्वी कॅरी मिनाटी विरूद्ध टिक टॉक असा वाद चांगलाच गाजला होता. सोशल मीडीयात त्याचे पडसाद पहायला मिळाले होते. कॅरीने एका व्हिडिओमध्ये टिकटॉक वरील काही युजर्सना रोस्ट केले होते. यामध्ये टोकाची मतप्रदर्शनं करण्यात आल्यानंतर युट्युब ने कॅरीचा व्हिडिओ युट्युबवरून हटवला होता.

अजय नागर हा 20-21 वर्षांचा युट्युबर आहे. मूळचा दिल्ली मधील फरिदाबाद मध्ये राहणारा अजय 'कॅरी मिनाती' नावाचं युट्युब चॅनेल चालवतो. त्याची युट्युबवर चांगली लोकप्रियता आहे. टिकटॉक विरूद्ध युट्युब या वादामध्ये अनेकांनी त्याचं समर्थन देखील केलं होते.