Bigg Boss Marathi Season 2: मराठी मधील बिग बॉस 2 सीझन लवकरच सुरु होणार आहे. या रियॅलिटी शो मधून महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) सूत्रसंचालन करताना दिसून येणार आहेत. तत्पूर्वी महेश मांजरेकर यांचा सध्या रॅपरच्या अंदाजातील हटके लूक सोशल मीडियात व्हायरल झाला असून प्रेक्षकांना बिग बॉस कधी सुरु होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
बिग बॉसच्या मंचावर लवकरच एक रॅप सॉन्ग लॉन्च करण्यात येणार आहे. या रॅप गाण्यासाठी महेश मांजरेकर त्यामधून झळकणार असून त्यांचा लूकसुद्धा प्रदर्शित करण्यात आला आहे.
डॅपर लूक आणि विंटेज बीटल रेट्रो गाडीवर बसलेला त्यांचा रॅपरच्या भुमिकेतीस लूक अधिकच खुलून दिसून येत आहे. (Bigg Boss Marathi Season 2: 'बिग बॉस'च्या यंदाच्या पर्वात स्पर्धकांना शहरी- ग्रामीण विभागाच्या जीवनाचा आनंद घेता घेणार?)
ऐका बहिणींनो आणि भावांनो... मी येतोय सांगायला तुम्हाला परवा एक रॅपचिक गोष्ट... #BiggBossMarathi2 #ColorsMarathi pic.twitter.com/JkFhyL8dvO
— Mahesh Manjrekar (@manjrekarmahesh) May 11, 2019
यापूर्वी बिग बॉस मराठी सीझन 1 चे शूटिंग लोणावळ्यात झाले होते. तर यंदाचा सीझनसाठीचा सेट गोरेगाव फिल्म सीटी येथे उभारण्यात आला आहे. तसेच यंदाच्या सीझनसाठी थीम काय असणार कोणते स्पर्धक यामध्ये सहभागी होणार याबद्दल चर्चा जोरदार रंगल्या आहेत.