Riteish Deshmukh | (Photo Credits: Instagram)

बिग बॉस मराठी-5 (Bigg Boss Marathi) केव्हा येणार? असा सवाल अनेक बिग बॉस प्रेमींना पडला होता. उत्सुकता वाढवणारा हा प्रश्न आता निकाली निघाला आहे. मराठी भाषेत खासगी खाजगी दूरचित्रवाणी वाहिनीवर झळकणारा हा रिअ‍ॅलीटी शो येत्या 28 जुलै रोजी रात्री 9 वाजलेपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शोचा प्रोमोदेखील झळकला असून, यंदा महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्याऐवजी रितेश देशमुख (Riteish Deshmukh) होस्ट असण्याची शक्यता आहे. जाहीर झालेल्या प्रोमोमध्ये रितेशच प्रमोशन करताना दिसतो आहे. या शोमधील स्पर्धकांबाबत (Bigg Boss Marathi Contestants) जोरदार उत्सुकता आहे.

Bigg Boss Marathi Grand Premiere

रितेश देशमुख याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन मराठी बिग बॉसबाबत माहिती दिली आहे. त्याने आपल्या पेजवर केलेल्या पोस्टध्ये 'सगळ्यांची वाजणार, हा सीजन गाजणार तो ही रितेशच्या style ने!', असे म्हटले आहे. त्याच पोस्टमध्ये मराठी मनोरंजनाचा बॉस “BIGG BOSS मराठी”चा Grand Premiere 28 जुलै, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि ऑफीशिअल जिओ सिनेमावर वर'' हा शो दिसणार असल्याचे त्याने म्हटले आहे. दरम्यान, इन्स्टावर शेअर करण्यात आलेल्या प्रमोमध्ये रितेशचा हटके अंदाज पाहायला मिळतो आहे. ज्यामध्ये तो म्हणतो, ''तंटा नाय तर घंटा नाय, ढोल ताशांच्या गजरात सगळे स्पर्धक बिग बॉसच्या चक्रव्युहात शिरणार.. जे चांगले वागणार त्यांची मी वाहवा करणार.. जे वाईट वागणार त्याची मी.. सगळ्यांची वाजणार.. हा सिजन गाजणार.. मी येणार तर कल्ला होणारच.. आता थांबलाच आहात..... तर नाराज नाय करणार.'' (हेही वाचा, Bigg Boss Marathi 5 Premier Date: बिग बॉस मराठी 5, 28 जुलै पासून; पहिल्यांदाच Riteish Deshmukh सूत्रसंचालक)

बिग बॉस मराठी-5 मधील स्पर्धक?

या वेळच्या हंगामात बिग बॉसमध्ये कोण कलाकार झळकणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. वास्तवात अनेक माध्यमांतून वेगवेगळे ज्येष्ठ आणि तरुण कलाकारांच्या नावांचा उल्लेख केला जातो आहे. मात्र त्याला अद्यापही अधिकृत दुजोरा मिळाला नाही. या सर्व उत्सुकतेवरील पडता येत्या 28 जुलै रोजीच उठणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर या स्पर्धकांची खरी नावे समजून घ्यायची असतील तर थोडा दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.

इन्स्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by @colorsmarathi

मराठी बिग बॉस या शोमध्ये आतापर्यंत अनेक कलाकारांची एन्ट्री झाली आहे. अनेक ज्येष्ठ आणि तरुण कलाकारांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला आहे. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की, यामध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांना स्पर्धक म्हणूनच वावरावे लागते. तसेच, त्यांना एका घरामध्ये (कथितरित्या) बंद केले जाते. केवळ इलेक्ट्रानिक्स उपकरणे वगळता इतर कोणत्याही प्रकारीच इलेक्ट्रिक वस्तू त्यांना वापरता येत नाहीत. त्यांचा बिगबॉसच्या घराबाहेरी कोणाशिही संपर्क होत नाही, असे सांगितले जाते. घरामध्ये मोबाईल अथवा इतर कोणतेही संपर्कमाध्यम उपलब्ध नसते. त्यामुळे या कलाकारांसाठी ही एक संयम आणि मनावरील नियंत्रणाची परीक्षा असते.