Bigg Boss Marathi 2 Winner: शिव ठाकरे 'बिग बॉस मराठी 2' चा विजेता; नेहा शितोळे दुसर्‍या तर वीणा जगताप तिसर्‍या स्थानी
शिव ठाकरे (फोटो सौजन्य-Twitter)

बिग बॉस मराठी 2 चे विजेतेपद कोण जिंकणार ही उत्सुकता आता संपली आहे. शिव ठाकरे याने नेहा शितोळेला कडवी टक्कर देत 'बिग बॉस 2' जिंकलं आहे. टॉप 6 मध्ये रंगलेला बिग बॉस मराठी 2 चा अंति म सोहळा मागील पर्वाप्रमाणेच खुमासदार रंगला. शिव आणि नेहा शितोळे हे टॉप 2 स्पर्धक होते. तर तिसर्‍या स्थानी वीणा जगताप, चौथ्या स्थानी शिवानी सुर्वे आणि पाचव्या स्थानी किशोरी शहाणे वीज होत्या तर महाअंतिम सोहळ्यातून बाहेर पडणारा पहिला स्पर्धक आरोह वेलणकर ठरला.

शिव ठाकरे हा मूळचा अमरावतीचा आहे. त्याचा प्रवास सुरुवातीपासून उत्तम राहिला होता. या घरात वयाने लहान आणि चित्रपट सृष्टीतील जास्त ज्ञान नसलेला शिव याने अन्य स्पर्धकांना टक्कर देत टॉप 6 मध्ये पोहचला आहे. यापूर्वी शिव 'रोडिज' या हिंदी रिएलिटी शोचा भाग होता. त्याने हिंदी, मराठी बिग बॉससाठी प्रयत्न केल्याचे सांगितले होते. पण केवळ खेळात सहभागी होण्याचं स्वप्न पाहिलेला शिव ते विजेता शिव ठाकरे हा प्रवास मोठ्या स्वपनपूर्तीचा असल्याचं त्याने म्हटलं आहे.(Bigg Boss Marathi 2 Grand Finale Live Updates: शिव ठाकरे ठरला बिग बॉस मराठी 2 च्या विजेतापदाचा मानकरी, नेहा शितोळे हिला मिळाला दुसऱ्या क्रमांचा मान)

परंतु फिनालेसाठी शेवटी वीणा, शिव आणि नेहा यांच्यामध्ये तगडी टक्कर झाल्याचे दिसले. मात्र अखेर शिव यानेच बिग बॉसच्या विजेतापदाचा मान पटकवला. शिवच्या विजयामुळे सर्वजण आनंदी झाले असून त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.