Bigg Boss Marathi 2: घरातल्यांनी पिडले प्रेक्षकांनी वाचवले; बिग बॉसच्या घरात वीणा जगताप हिची अवस्था
Veena Jagtap | (Photo Credits: Twitter)

Bigg Boss Marathi 2: बिग बॉस मराठी सीजन २ च्या घरात गेल्या आठवड्यात चर्चेचा विषय ठरलेल्या वीणा जगताप (Veena Jagtap) हिला प्रेक्षकांनी बहुमताने वाचवले आहे. विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi), शिवानी सुर्वे (Shivani Surve) आणि वैशाली म्हाडे (Vaishali Mhade) यांच्यासोबत झालेले वाद आणि रुपाली भोसले (Rupali Bhosale) किशोरी शहाणे (Kishori Shahane), पराग कान्हेरे (Parag Kanhere) आणि शिव ठाकरे यांसोबतची मैत्री यामुळे वीणा जगताप गेल्या आठवड्यात चर्चेत आली. घरातील एकूण वातावरण पाहता घरातल्यांनी पिडले प्रेक्षकांनी वाचवले, अशी अवस्था बिग बॉसच्या घरात वीणा जगताप हिची पहायला मिळाली.

गेल्या आठवड्यात वीणा जगताप आणि शिवानी सुर्वे ही जोडी जोरदार चर्चेचा विषय ठरली. त्यात चोर-पोलीस टास्कदरम्यान शिवानी आणि विणामध्ये वाजलेलं 'लाथ' प्रकरण जरा अधिकच गाजलं. इतकेच नव्हे तर त्यावरून बिग बॉसच्या घरात खटलादेखील चालला. मात्र, आपली बाजू भक्कम असूनही घरच्या सदस्यांच्या बहुमतामुळे वीणाला अपराधी घोषित करण्यात आले. शिवाय विकेंड च्या डावात घरच्या सदस्यांचे बहुमत न मिळाल्यामुळे वीणाच्या डोक्यावर बर्फाचे थंड पाणी ओतले गेले. शिक्षेला खिलाडूवृत्तीने सामोरे गेलेल्या वीणाने केमेऱ्यासमोर येऊन आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित वीणाच्या याच संयमी वृत्तीवर खुश होऊन, तिच्या चाहत्यांनी तिला घरातून बाहेर जाण्यापासून वाचवले असावे. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 2 Day 16 Episode Preview: बिग बॉस सुनावणार आज घरातील सार्‍याच सदस्यांना कठोर शिक्षा (Watch Video))

वीणासाठी बिग बॉसच्या घरातला हा दुसरा आठवडा 'कभी ख़ुशी कभी गम' असा ठरला. मात्र घराबाहेर चाहते आणि प्रेक्षकांमध्ये ती चर्चेत राहिली