आरोह वेलणकर (Photo Credit : Instagram)

बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व (Bigg Boss Marathi 2) आता महत्वाच्या वळणावर येऊन ठेपले आहे. घरातीली बाळबोध भांडणे, तसेच टास्क, वैयक्तिक आयुष्यावर ओढले गेलेले ताशेरे अशा सर्व गोष्टी पाहून अजून तरी बोटावर मोजता येणाऱ्या प्रेक्षकांमुळे हा शो तग धरून आहे. शिवानीच्या रिएन्ट्रीमुळे भांडणातील मजा वाढली असल्याचे सोशल मिडीयावर बोलले जात आहे. या सर्वांत भर म्हणून आता शनिवारी नव्या सदस्याची वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री झाली आहे.

‘रेगे’ फेम आरोह वेलणकर (Aroh Welankar) या घरात दाखल झाला आहे. प्रविण तरडे लिखित आणि अभिजीत पानसे दिग्दर्शित या चित्रपटाने आरोहला वेगळी ओळख निर्माण करून दिली होती.

आरोह मुळचा पुण्याचा असून, तो इंजिनीअर आहे. कॉलेजमध्ये अनेक नाटके, एकांकिका गाजवल्यानंतर तो चित्रपटाकडे वळला.

2014 साली आरोहचा रेगे हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातील त्याच्या अभिनयाची चुणूक पाहून त्याला घंटा हा चित्रपट ऑफर झाला, जो 2016 साली प्रदर्शित झाला.

त्यानंतर प्रदर्शित झालेल्या होस्टेल डेजनंतर, आरोह ने मागच्या वर्षी तब्बल 4 वर्षांनतर WHY So गंभीर नाटकाद्वारे रंगभूमीवर पाऊल ठेवले.

आरोहाचे कविता करणे, टाइल पेंटिंग, वस्तुचित्र, लँडस्केप, अमूर्त ड्रॉइंग करणे, मैदानी खेळ असे काही छंद आहेत. (हेही वाचा: Bigg Boss च्या घरात प्रवेश करणारी Hot आणि Sexy हीना पांचाळ नक्की आहे कोण? (Photos))

 

View this post on Instagram

 

Style south, operation complete north. Congrats piyush. #family #wedding #theme #southindian #fun #funtimes.

A post shared by Aroh Welankar (@arohwelankar) on

 

View this post on Instagram

 

Attentive, Listening, focusing. Back to work, back to the grind. #actor #actorslife #routine #busy #meetings #newprojects #happiness

A post shared by Aroh Welankar (@arohwelankar) on

सर्वोत्तम पदार्पणासाठी ‘दादासाहेब फाळके पुरस्कार-2015’, ‘झी-महाराष्ट्राचा फेवरेट कोण - चित्रपट पदार्पण पुरस्कार-2014’ असे मानाचे पुरस्कार त्याला त्याच्या अभिनयासाठी प्राप्त झाले आहेत.

11 डिसेंबर 2017 रोजी आरोह वेलणकर विवाहबंधनात अडकला. आपल्या दीर्घकालीन गर्लफ्रेंड अंकिता शिंघवीसोबत आरोहने नव्या जीवनाची सुरुवात केली.

आता आरोह बिग बॉसच्या घरात आहे, इथे कसा खेळेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.