Bigg Boss फेम शेफ पराग कान्हेरे च्या आयुष्यात आला लव्ह तडका; इंस्टाग्राम वर दिली प्रेमाची कबुली
Parag Kanhere With Girlfriend Mukta Bhatkhande (Photo Credits: Instagram)

प्रसिद्ध शेफ आणि बिग बॉस मराठी 2 मधील बहुचर्चित स्पर्धक शेफ पराग कान्हेरे (Parag Kanhere) याच्या आयुष्यात नुकताच एक लव्ह अँगल आला आहे. परागने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून आपल्या गर्लफ्रेंड सोबतचा फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. परागच्या आयुष्यातील या खास व्यक्तीचं नाव आहे मुक्ता भातखंडे (Mukta Bhatkhande). नुकत्याच पार पडलेल्या व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) निमित्त मुक्ता आणि परागने जोरदार सेलिब्रेशन केले, यातीलच काही क्षण आपल्या सोशल मीडियावर शेअर करत परागने आपले प्रेम कबूल केले आहे. " होय, मी प्रेमात आहे, आता सर्व शस्त्र खाली टाकून मी आयुष्यभरासाठी तुझा होत आहे, असे म्हणताना परागने आपली गर्लफ्रेंड मुक्ताचे आभार मानले आहेत. Bigg Boss Marathi 2 विजेता शिव ठाकरे आणि वीणा जगताप नवस पूर्ण करण्यासाठी अनवाणी पोहचले वैष्णोदेवीच्या दर्शनाला

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात पराग कान्हेरेला जबरदस्त प्रसिद्धी मिळाली होती, पण शो दरम्यान त्याने नेहा शितोळे सोबत केलेल्या वर्तणुकीमुळे त्याला मध्यातच शो सोडून जावे लागले होते. यांनतर काही काळ पराग हा लाइमलाईट पासून जरा लांबच होता. आता व्हॅलेन्टाईन डे ला त्याने ही पोस्ट करताच पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

पहा पराग कान्हेरे पोस्ट

दरम्यान, दुसरीकडे पराग आणि रुपाली भोसले यांच्यातील मैत्री हे शो मधील त्याचा परफॉर्मन्स गाजण्याचे कारण ठरले होते. अनेकवेळेस या दोघांची नावे एक्मेकांशी जोडण्यात आली होती, मात्र रुपालीने त्याला दुजोरा दिला नाही, तर घराबाहेर पडताच रुपालीने अंकित मगरे याच्यासोबत आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केला होता, यापाठोपाठ आता पराग ने सुद्धा मुक्ता सोबतचे आपले प्रेमसंबंध ऑफिशियल केले आहेत.