Bigg Boss Marathi 2, Episode 97 Preview: घराबाहेर गेलेल्या स्पर्धकांसोबत रंगणार BB  नाइट,पुरस्कारांच्या माध्यमातून टॉप 6 स्पर्धकांची उडवणार खिल्ली
Bigg Boss Marathi 2 Preview (Photo Credits: Voot)

Bigg Boss Marathi 2: बिग बॉस मराठी  चे दुसरे पर्व जसजसे ग्रँड फिनाले च्या जवळ येत आहे तसतशी प्रेक्षकांची उत्सुकताही अगदी शिगेला पोहोचत आहे. तो राडा, ती भांडणे, ती थट्टामस्करी, कुस्करी आणि हो त्या घराची लाईट आता कायमची बंद होणार. पण त्या आधी जाता-जाता या घरात गेले 100 दिवस ज्या लोकांसोबत काही क्षण घालवले त्यांचीशी पुन्हा एकदा संवाद साधण्याची संधी बिग बॉसने या टॉप 6 स्पर्धकांना देणार आहे. कारण आज बिग बॉसच्या घरात या पर्वात घराबाहेर पडलेले स्पर्धक पुन्हा घरात प्रवेश करणार आहे आणि त्यांच्या साक्षीने बिग बॉसच्या घरात होणार 'बीबी अॅवॉर्ड नाइट' (BB Award Night) हे कार्य.

या अॅवॉर्ड नाइटमध्ये जुने स्पर्धक आणि टॉप 6 स्पर्धक धमाल करताना दिसणार आहेत. पाहा व्हिडिओ

हेही वाचा- Bigg Boss Marathi 2, August 29, Episode 96 Update: बिग बॉसच्या घरात रंगले शिवानीचे बर्थडे सेलिब्रेशन; सदस्यांनी पाहिला त्यांचा आतापर्यंतचा थक्क करणारा प्रवास

यात विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi) आपल्या विनोदी शैलीत आणि दिगंबर नाईक (Digambar Naik) यांनी आपल्या मालवणी शैलीत स्पर्धकांची खिल्ली उडवताना दिसतील. त्याचबरोबर यात माधव देवचक्के, वैशाली माडे, रुपाली भोसले यांना सर्वोत्कृष्ट खांदा अॅवॉर्ड या विभागात नामांकन मिळाली आहेत. तर यावर विद्याधर आणि दिगंबर यांची जबरदस्त कॉमेंट्री ऐकायला मिळणार आहे.

गुरुवारी प्रसारित झालेल्या भागात शिवानीच्या बर्थडे सेलिब्रेशनने होते.त्यानंतर घरातील टॉप 6 स्पर्धकांचा प्रवास दाखवण्यात आला. तसेच इतरही अनेक गोष्टी मांडल्या गेल्या