Bigg Boss Marathi 2, Episode 95 Preview: किशोरी शहाणे, नेहा शितोळे आणि शिव ठाकरे यांना मागील 3 महिन्यांचा प्रवास पाहून अश्रू झाले अनावर
Bigg Boss Marathi 2 (Photo Credits: Voot)

बिग बॉस मराठी 2 चा प्रवास आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. टॉप 6 सदस्यांसह यंदा बिग बॉसच्या घरात आता 1 सप्टेंबर दिवशी अंतिम सोहळा रंगणार आहे. आरोह वेलणकर, शिव ठाकरे, वीणा जगताप, नेहा शितोळे, शिवानी सुर्वे आणि किशोरी शहाणे या सहा सदस्यांमध्ये यंदा अंतिम सोहळा रंगणार आहे. यामध्ये काल ( 27 ऑगस्ट) दिवशी घरात पत्रकार परिषद रंगल्यानंतर आजपासून घरातील सदस्यांना त्यांच्या घरातील मागील 3 महिन्यांमधील प्रवासामधील चढ उतार खास एव्हीच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. पहा आजच्या भागामध्ये काय होणार?

आज ( 28 ऑगस्ट) बिग बॉस मराठी 2 च्या घरात नेहा शितोळे, किशोरी शहाणे आणि शिव ठाकरे यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. मागील तीन महिन्यात बिग बॉस मराठीच्या घरात खेळताना सदस्यांमध्ये हेवे दावे झाले, वाद रंगले, कधी शाब्दीक तर कधी अगदी शारिरीक घावही काही सदस्यांनी झेलले. या तीन महिन्यांच्या प्रवासामध्ये आपण स्क्रिनवर कसे दिसत होतो हे पहिल्यांदाच घरातील टॉप 6 सदस्यांनाही पाहता येणार आहे. हा खास एव्ही पाहताना किशोरी शहाणे, नेहा शितोळे आणि शिव ठाकरे याला अश्रू अनावर झाले आहेत. आतापर्यंत बिग बॉस मराठी 2 च्या घरात काय काय झालंय? 

पाहुणे सदस्य म्हणून घरात वावरत असणारे अभिजीत बिचुकले अंतिम फेरीच्या काही दिवस आधी घराबाहेर पडले आहेत. चर्चित आणि वादग्रस्त पण तितक्याच संवेदनशील मनाच्या बिचुकलेंच्या एक्झिटनंतरही घरातील सदस्यांचे डोळे पाणावलेले दिसले. आता अंतिम सामन्यासाठी आम्ही सारेच सज्ज आहोत असे त्यांनी काल सांगितले आहे. अनेकांचे घराबाहेर पडल्यानंतर प्लॅन काय असतील याचीदेखील यादी तयार आहे. आता घरातील सदस्यांसोबतच रसिकांनाही बिग बॉस मराठी 2 ची ट्रॉफी कोण जिंकणार याची उत्सुकता लागली आहे.