बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi 2) घरातील टॉप 6 स्पर्धकांना रिऍलिटी चेक देण्यासाठी आज BB हाऊस मध्ये पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये शिव-वीणा (Shiv - Veena) व नेहा- शिवानी (Neha- Shivani) यांच्या नात्यावर बरीच चर्चा रंगली होती.सामान्य नागरिकांना पडलेल्या अनेक प्रश्नावर आज स्पर्धकांची शाळा घेण्यात आली. घराबाहेर हट्टाने पडलेली शिवानी फिनाले मध्ये जाणे पटते का? शिव आणि वीणा खरंच लग्न करणार का? किशोरी शहाणे आपली भूमिका का मांडत नाहीत असे प्रश्न वारंवार विचारले जात होते. यावर शिवानीने आपल्या तब्येतीचे कारण सांगून तर किशोरी यांनी खेळाची स्ट्रॅटर्जी असा युक्तिवाद करत आपल्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. तर शिव आणि वीणाने आपल्या लग्नाची घोषणा करून त्यांच्या नात्यावर केल्या जाणाऱ्या टिपण्या सपशेल खोट्या ठरवल्या. इतकेच नव्हे तर वीणाने बोलताना लग्न केल्यास विदर्भात आणि उल्हासनगरला करून सर्वांना आमंत्रण देऊ असेही सांगितले. पाहा व्हिडिओ
आजच्या भागाच्या सुरुवातीला बिचुकले यांची आठवण काढत सर्व स्पर्धक पुन्हा एकदा भावुक झाले होते. याच वातावरणात शिवानी देखील स्वतः वीणाला मिठी मारून आपले वाद संपवण्याचे बोलून दाखवते ज्यावर वीणा देखील आपण इथलं इथेच सोडून जायचं आहे असे म्हणत दुजोरा देते. अर्थात शेवटचे काहीच दिवस शिल्लक असताना सदस्यांमध्ये आता तरी कुठे जिव्हाळा दिसू लागतोय असे वाटू लागते पण तितक्यात पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा स्पर्धकांचे हेवेदावे दिसून येतात. शिवानी आणि वीणाला तुम्ही घराबाहेर पडल्यावर कोणाचे तोंड बघू इच्छित नाही असे विचारल्यावर त्या दोघीही एकमेकांचे नाव अप्रत्यक्ष पणे घेतात. तर,घरात घडलेल्या प्रसंगावरून विचारणा केली असता प्रत्येक जण आपल्या स्वभावाचे कारण देत वेळ मारून नेताना पाहायला मिळाले.
दरम्यान, एका प्रश्नातून सदस्यांना कोणत्या प्रसंगासाठी तुम्ही इतरांची माफी मागाल असे विचारण्यात येते, यावेळी शिवानीने किशोरी यांच्याशी भांडणांविषयी तर वीणाने शिवानी आणि नेहाला दयेने तिकीट टु फिनाले मिळाले आहे अशा विधानासाठी त्यांची माफी मागितली. उद्याच्या भागात प्रेक्षकांसह स्पर्धकांना त्यांचा बिग बॉसच्या पर्वातील प्रवास दाखवण्यात येणार आहे, यावेळी काय घडते हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा बिग बॉस मराठी सीझन 2!