Bigg Boss Marathi 2, Episode 94 Preview: बिग बॉसच्या घरात आलेल्या पत्रकारांनी घेतला स्पर्धकांचा क्लास, वीणाने केलेल्या या वक्तव्याबद्दल मागितली शिवानी आणि नेहाची माफी
Bigg Boss Preview 94 (Photo Credits: Voot)

Bigg Boss Marathi 2: बिग बॉस मराठी च्या दुस-या पर्वाचा अंतिम निकाल काही दिवसांवर येऊन ठेपला असून या पर्वाची ट्रॉफी कुणाकडे याकडे सर्वांचे लक्ष लागलय. मग त्यात प्रेक्षकांसोबत पत्रकार बांधव देखील कसे काय मागे राहतील. त्यांच्या मनातही अनेक प्रश्न असतील. हेच प्रश्न घेऊन सर्व स्पर्धकांचा क्लास घेण्यासाठी आज महेश मांजरेकरांच्या जागी बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi 2) च्या घरात प्रवेश करणार पत्रकार. आपल्या प्रश्नांनी ते सर्व स्पर्धकांच्या नाकी नऊ आणणार हे काही वेगळं सांगायची गरज नाही.

प्रेक्षकांना पडलेले प्रश्न हे पत्रकार स्पर्धकांना विचारून चांगलेच फैलावर घेताना दिसणार आहेत. पाहा व्हिडिओ

तर दुसरीकडे वीणाने शिवानी सुर्वे (Shivani Surve) आणि नेहा शितोळे (Neha Shitole) यांच्या बाबत असे वक्तव्य केले होते की, घरातून बाहेर पडलेल्या स्पर्धकांनी दया करुन या दोघींना तिकिट टू फिनाले चे तिकिट दिले आहे. त्याबाबत एका पत्रकाराने विचारले असता, तिने त्या दोघींची सर्वांसमोर माफी मागितली.

हेही वाचा- Bigg Boss Marathi 2, Episode 93 Preview: बिग बॉस च्या घरात सदस्यांनी केली पूलपार्टी; बिचुकले यांच्याबद्दल रंगणार शेवटचा टास्क

तर दुसरीकडे शिवानीवरही तू इतर स्पर्धकांपेक्षा या तिकिट टू फिनाले साठी पात्र होतीस का असा खोचक प्रश्नही विचारला गेला. तसेच शिव हा वीणाच्या हातातलं बाहुल झाला आहे, असा आरोप ही पत्रकारांनी शिववर केला आहे. आता या आणि अशा अनेक प्रश्नांना हे स्पर्धक कसे सामोरे जातात की आपापसातच भिडतात, हे आजच्या भागात कळेलच.