Bigg Boss Marathi 2, Episode 93 Preview: बिग बॉस च्या घरात सदस्यांनी केली पूलपार्टी; बिचुकले यांच्याबद्दल रंगणार शेवटचा टास्क
Bigg Boss Marathi 2, Episode 93 Preview (Photo Credit : Colors Marathi)

बिग बॉस मराठी सीझन 2 चा शेवटचा आठवडा चालू झाला आहे. आता सर्वांनाच उत्स्कुता आहेत ती फिनालेची.मागच्या आठवड्यातील सहाही सदस्य म्हणजे, आरोह, नेहा, शिवानी, वीणा, किशोरी, शिव फिनालेमध्ये पोहचले आहेत. आजच्या भागात सर्व सदस्य शेवटच्या आठवड्यात गुण्यागोविंदाने राहण्याची प्रतिज्ञा घेताना दिसणार आहेत. यासाठी सर्वजण आनंदात, नृत्य करत पूलपार्टी साजरी करतात. यामध्ये बिचुकले मात्र सहभागी होत नाहीत. सर्वजण आरडा ओरडा करत, ज्यूस पीत टॉप 6 चा आनंद साजरा करतात.

आज बिग बॉस घरातील सदस्यांना शेवटच्या पर्वातील शेवटचे कार्य सोपवणार आहेत. हे कार्य अभिजित बिचुकले यांच्याबद्दल असणार आहे. या टास्कद्वारे घरातील सदस्य अभिजित बिचुकले यांना कितपत आणि कसे ओळखतात ते जाणून घेतले जाणार आहेत. या टास्कला नावच ‘अभिजित बिचुकले असे दिले जाते’. यामध्ये घरातील सदस्यांनी अभिजित बिचुकले यांच्यावर खास कार्यक्रम सादर करायचा आहे, (आज काय होईल ते इथे पहा)

(हेही वाचा: नेहा, शिवानी, आरोह, किशोरी, शिव आणि वीणा पोहचले बिग बॉसच्या फिनालेमध्ये, अभिजित बिचुकले यांची घरातील एक्झिट उद्या ठरणार)

म्हणजेच प्रत्येक सदस्यांने सर्वांसमोर बिचुकले यांच्याबद्दल काही सदर करून दाखवायचे आहे. इथे नेहा अभिजित बिचुकले यांच्यावर एक कविता सादर करते. यामध्ये ती बिचुकले नक्की कसे आहेत याचे वर्णन करते. आता इतर सदस्य नक्की काय सादर करतीत ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.