Bigg Boss Marathi 2, Episode 84 Preview: अभिजित बिचुकले यांच्यावर भडकले महेश मांजरेकर; शिव आणि वीणाच्या नात्याबद्दल घेतला गेला खरपूस समाचार
Bigg Boss Marathi 2, Episode 84 Preview (Photo Credit : Colors Marathi)

बिग बॉस मराठी सीझन 2 (Bigg Boss Marathi 2) च्या फिनालेला अवघे काही दिवस बाकी आहेत. याकाळात घरातील सदस्यांचे विविध गुण चाहत्यांना दिसावे म्हणून बिग बॉसकडून अनोखे टास्क देण्यात येत आहेत. कालही असाच ब्रेकिंग न्यूज हा टास्क पार पडला. आता आज वीकएंडचा डाव रंगणार आहे. बिचुकले घरात आल्यावर घरातील रंग बदलले आहेत. बिग बॉसच्या टीआरपीसाठी याचा फायदा होत आहे मात्र बिचुकले घरातील सदस्यांशी जुळवून घेण्यात कमी पडत आहेत. या आठवड्यात वीणा आणि बिचुकले यांच्या वादाला सुरुवात झाली, ज्याचा समाचार आज महेश मांजरेकर यांच्याकडून घेतला जाणार आहे.

बिचुकले घरातील सदस्यांची लायकी काढतात याबाबत त्यांना विचारणा होणार आहे. घरातील सदस्यांची लायकी काढता मात्र तो विषय माफी मागून तिथेच का संपवत नाही? असा प्रश्न महेश मांजरेकर यांच्याकडून विचारला जाणार आहे. यावर बिचुकले काय उत्तर देतील यासाठे पहा बिग बॉस मराठीचा आजचा एपिसोड.

आजच्या वीकएंडच्या डावात अजून एका सदस्याची शाळा घेतली जाणार आहे तो म्हणजे शिव ठाकरे. शिव आणि वीणा यांच्या प्रेम प्रकरणाने आता सर्वांनाच बोअर केले आहे. त्यात वेळोवेळी अनेक लोकांनी शिवला समजावून सांगूनही त्याचे वीणावरील लक्ष हटले नाही. वीणाचे मन जिंकण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले, आतातर त्याने तिला मिठ्या मारायला सुरुवात केली आह, म्हणूनच शिवचे नाव मिठीबाई असे ठेवण्यात आले आहे. या सर्व घटनेबाबत महेश मांजरेकर शिवला प्रचंड झापणार आहेत.