Bigg Boss Marathi 2 Episode 52 Preview: माधव आणि हिना यांच्यात झाले वाद, तर कप्तानपदाच्या टास्कमध्ये कोण जिंकणार? (Watch Video)
Bigg Boss Marathi 2(Photo Credits-Twitter)

बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi 2) आता उत्तरार्धाकडे वळू लागला आहे. तर पुढील आठवड्यासाठी बिग बॉसने घरातील स्पर्धकांना समुद्रमंथन नावाचा टास्क कप्तानपदासाठी दिला आहे. कप्तानपदासाठी आता वीणा आणि रुपाली या दोघींमध्ये लढत सुरु आहे. मात्र आजच्या भागात कोण कप्तानपदासाठी मानकरी ठरणार हे पाहायला मिळणार आहे.

तत्पूर्वी कालच्या भागात समुद्र मंथन या टास्कदरम्यान तीन फेऱ्या पार पडल्या असून आजच्या भागात शेवटची फेरी पार पडणार आहे. या फेरीत वीणा आणि रुपालीच्या समर्थकांमधून एक महिला आणि पुरुष सदस्याला नॉमिनेट करायचे आहे अशी अट ठेवण्यात आली आहे. परंतु रुपालीच्या समर्थकांमध्ये नॉमिनेशन वरुन खटके उडताना दिसून आले. तर आज रात्री कोण पुढील आठवड्यासाठी नॉमिनेट झाले आहे हे कळणार आहे.(येथे पाहा आजच्या भागात काय घडणार?)

(Bigg Boss Marathi 2, 15 July, Episode 51 Updates: वीणा जगताप हिच्या डोळ्यात शिव ठाकरे याला दिसतंय बरंच काही; घ्या जाणून)

तर दुसऱ्या बाजूला हिना आणि माधव यांच्यामध्ये वाद झाल्याचे दिसून येणार आहे. मात्र नेमक्या कोणत्या कारणामुळे माधव हिनावर संतापला आहे हे आजच्या भागात पाहणे महत्वाचे ठरणार आहे. परंतु त्यापेक्षा अधिक रुपाली की वीणा यापैकी कोणाची वर्णी कप्तानपदी होणार हे पाहणे उत्सुकचे ठरणार आहे.