Bigg Boss Marathi 2 Episode 50 Preview: शिवानी सुर्वे  तिच्यावरील वैयक्तिक टिप्पणीवर विचारणार वीणा ला जाब, तर मांजरेकर करणार खेळातून सदस्यांची खरी - खोटी
BBMarathi 2 (Photo Credits: Twitter/ Colors Marathi)

Bigg Boss Marathi 2 Episode 50 Sneak Peek: बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi) घरातील बहुचर्चित स्पर्धकांपैकी एक शिवानी सुर्वेने (Shivani Surve) पुन्हा एन्ट्री घेतली आहे. वैद्यकीय कारणांवरून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर बिग बॉस टीम आणि शो चे होस्ट महेश मांजरेकरांनी तिचा घराबाहेर पडण्याचा मार्ग मोकळा केला मात्र आता पुन्हा तिची एंट्री झाल्याने घरातील सदस्य असुरक्षित झाले आहेत. शिवानी घरात सदस्य म्हणून नव्हे तर पाहुणी म्हणून आली आहे. पण ही गोष्ट घरातील सदस्यांना अद्याप ठाऊक नाही. त्यामुळे शिवानी सुर्वेच्या घरवापसीमुळे सदस्यांमध्ये कुजबूज होण्यास सुरूवात झाली आहे. घराबाहेर पडलेल्या शिवानीने आता घरात प्रत्येकाचे खरे चेहरे कसे आहेत? हे सांगायला सुरूवात केली आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर घरात वातावरण पुन्हा तापलेले असेल असे आजच्या विकेंडच्या डाव प्रोमोमधून दिसतंय. आत्तापर्यंत बिग बॉस मराठी 2 च्या घरात काय काय झालंय?  

विकेंडच्या डाव दिवशीच शिवानी घरात आल्याने आज महेश मांजरेकरांसमोर ती अनेकांची पोलखोल करणार असल्याचं चित्र आहे. प्रोमोमध्ये दाखवल्यानुसार, पराग आणि वीणा शिवानीबद्दल चर्चा करत असताना वैयक्तिक टिप्पणी करत असल्यावरून आज वीणाला जाब विचारणार आहे. त्यामुळे घरात आरोप - प्रत्यारोपांदरम्यान खडाजंगी होणार आहे. पहा आजच्या भागात काय होणार?  

रंगणार खेळ

आठवड्याभरातील घरातील सदस्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध कंगोरे उलगडत आहेत. त्यामुळे स्वभावानुसार माचिस कोण? खंजीर कोण कुणाच्या पाठीत खुपसतं यावरूनही आज चर्चा रंगणार आहे. तसेच वीणा अअणि अभिजीतच्या घरातल्या वागणुकीची खरी- खोटीदेखील आज बिग बॉसच्या घरात शिवानी सुर्वेच करणार आहे. त्यामुळे शिवानीच्या घरात परतल्याने आता काय काय होणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

सध्या बिग बॉस मराठी 2 चा टप्पा निम्म्यापर्यंत येऊन ठेपला आहे. घरात वाईल्ड कार्ड म्हणून अजूनही काही सदस्य एंट्री करू शकतात.त्यामुळे पुढे हा खेळ किती रंगतदार होणार आहे? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.