BBMarathi 2 (Photo Credits: Twitter)

बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi) च्या घरात सध्या सई, पुष्कर, शर्मिष्ठा आणि स्मिता हे चार सदस्य अतिथी म्हणून आले आहेत. या सदस्यांच्या दिमतीला सध्या सारे घरं असल्याने त्यांच्यामधील हेवेदावे बाजूला पडून घर एकत्र काम करत आहे. पण तरीही साप्ताहिक कार्य असल्याने टीममध्ये स्पर्धा आहे. त्यामुळे सहाजिकच एरवी पाहुण्यांसमोर जे व्यक्त करता येत नाही ते घरातील सदस्य एकमेकांसमोर व्यक्त करत आहेत. आज मन मोकळं करताना सुरेखा पुणेकरांनी अभिजीत केळकरसमोर रडल्या. तर वीणा आणि रूपालीमधील वाद देखील रूपालीने वैशालीसमोर व्यक्त केला आहे. पहा आजच्या भागात काय होणार

सध्या बिग बॉसचं घर एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रूपांतरीत करण्यात आलं आहे. त्यामध्ये बिग बॉस सीझन 1 मधील सदस्य अतिथी म्हणून आले असून त्यांना खूष ठेवायचं आहे. मात्र सई, पुष्कर, स्मिता आणि शर्मिष्ठा यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करायचं आहे. त्यावर टीमचे स्टार्स आहेत. जी टीम हरणार त्यांच्या नॉमिनेशनवर परिणाम होणार आहे. त्यामुळे या खेळाची चुरस वाढली आहे.

पराग, शिवानी आणि अभिजीत बिचुकले घराबाहेर पडल्याने त्यांच्या जागी आता नवी वाईल्ड कार्ड एन्ट्री कोण? ही उत्सुकता लोकांच्या मनात आहे. काही प्रोमोमध्ये सई लोकूरचं घरात दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री असेल असं सांगण्यात आलं आहे. मात्र आज त्याचा नेमका उलगडा होणार आहे.