Bigg Boss Marathi 2 Day 5 Episode Preview: 'बिग बॉस' च्या घरात आज रंगणार पहिला Captaincy Task? कोणाला मिळणार कॅप्टनपद? पाहा आजचा एपिसोड
Marathi Bigg Boss 2 (Photo Credits-Twitter)

Bigg Boss Marathi 2 Day 5 Episode Preview: मराठी बिग बॉसच्या 2 पर्वाला सुरुवात झाली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांमध्ये वादावादी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर आज बिग बॉसच्या घरातील पाचवा दिवस असून स्पर्धकांना घराच्या कॅप्टन पदासाठी विराजमान होण्यासाठी एक टास्क देण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या भागात कॅप्टन्सी टास्क रंगताना दिसून येणार आहे.

परंतु कॅप्टन पदासाठी दावेदार होण्यासाठी निवडणूक होणार आहे. तसेच दोन गटात ही निवडणूक होणार असून पहिली टीम अभिजित बिचुकले यांच्यामधून नेहा शितोळे आणि दुसरी टीम वैशाली म्हाडे मधून शिव ठाकूर यांच्यामध्ये लढत रंगणार आहे. त्यामध्ये नेहा हिच्यासाठी अभिजित बिचुकले प्रवक्ता असणार आहेत. तर शिवसाठी वीणा जगताप या प्रवक्ता असणार आहेत. तर बिग बॉसचे ठरवून दिलेल्या प्रवक्त्यांना आपापल्या उमेदवारांचा प्रचार करायचा असणार आहे. त्याचसोबत त्या उमेदवारा बिग बॉसच्या घरातील अन्य स्पर्धकाकडून जास्त मते मिळतील तोच उमेदवार पहिल्या कॅप्टन पदाचा दावेदार ठरणार आहे.(Bigg Boss Marathi 2: बिग बॉसच्या घरात एकटे पडले अभिजित बिचुकले; पत्नीने सदस्यांवर केले हे आरोप)

तर दुसऱ्या बाजूला घरातील मंडळी कासव आणि ससा यांच्या गाण्यावर नाचताना दिसून येत आहेत. मात्र घरातल्या शर्यतीत कोण कासव आणि ससा ठरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मात्र नेहमीप्रमाणे रुपाली आपला आवाज वाढवून बिचुकले यांच्या चुकीच्या वागणुकीवर टीका करताना दिसून आली. तसेच बिग बॉसच्या घरात बिचुकले यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे दिसून येणार आहे.