![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/08/House-Day-98--380x214.jpg)
आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बिग बॉसच्या घरात रंगत असलेल्या 'बीबी अवॉर्ड नाइट'मध्ये सर्वोत्कृष्ट खांदा अवॉर्डसाठी- माधव देवचक्के, रुपाली भोसले, वैशाली माडे यांच्या नावाची निवड केली जाते. यामध्ये माधव याच्या नावाची निवड सर्वानुमते केले गेल्यानंतर अभिजित बिचुकले यांच्या हस्ते त्याला पुरस्कार देण्यात येतो. तसेच सर्वोत्कृष्ट न्याय देता कोण न्याय अवॉर्ड -किशोरी,उचलली जीभ लावली टाळ्याला अवॉर्ड-शिवानी, मला काही कळतच नाही अवॉर्ड-हिना पांचाळला देण्यात येतो. अशाप्रकारे बीबी हाउसमधील अवॉर्ड नाइटची सांगता होते. तत्पूर्वी सुरेखा पुणेकर या वैशाली माडे हिच्या 'आला गं बाई, आला गं बाई' या गाण्यावर थिरकताना दिसून येतात.
तर घरातून काही दिवसांपूर्वी बाहेर पडलेले अभिजित बिचुकले यांना आरोह फुकट आणि घुबड बोलल्याने सुरु असलेल्या अवॉर्ड नाइटला वादाचे स्वरुप येते. बिचुकले एकदा भडकले की त्यांना ते काय करत आहेत किंवा काय बोलतात याचे भान राहत नसल्याचा प्रत्यय आज पुन्हा दिसून आला. तसेच बिचुकले यांच्या हातात असलेला काचेचा ग्लास फोडून टाकण्याची धमकी देत खुर्ची उचलून राग व्यक्त करतात. यावर शिव याच्यासह घरातील अन्य सदस्य त्यांना राग शांत करण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु तरीही बिचुकले यांचा राग शांत होत नसल्याने सुरेखा सुद्धा वादात सहभागी झाल्याने त्यांना ही सुनावतात.
घरात घडलेल्या या वादामुळे बिचुकले यांना बिग बॉस कन्फेशन रुममध्ये बोलवले जाते. त्यावेळी घरातील जुन्या सदस्यांना पुन्हा एकदा प्रवेश दिल्याची समज देतात. परंतु अभिजित बिचुकले यांनी केलेला हा प्रकार भोवतो. तसेच बिग बॉस त्यांना घराच्या मागील बाजूने बाहेर पडण्यास बाप्पा सर्वांसमोर कपडे बदलत असताना दिसून आल्याने त्याला अडगळीच्या खोलीत नेले जाते. (Bigg Boss Marathi 2, Episode 98 Preview: बिग बॉसच्या घरात सकाळी लावलेल्या गाण्यामुळे सदस्यांच्या आठवणीला मिळणार उजाळा, सुरेखा पुणेकर लावणीवर थिरकताना दिसणार)
तसेच सदस्यांची पहाट 90'S मधील अजीब दास्ता है या गाण्याने सुरुवात होते. यावेळी सर्व सदस्य या गाण्याचा आनंद घेत जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसून येतात. फिनालेसाठी फक्त काही तास उरले आहेत तरीही घरात काही फेक सदस्य असल्याची टीका वीणा करते. अभिजित, हिना, वीणा आणि शिव यांचा नवा ग्रुप आज बिग बॉसच्या घरात दिसून येतो. दुसऱ्या बाजूला माधव आणि नेहा बाहेर झोपाळ्यावरुन बसून शिवानी हिने त्याच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण देते.
पाहुणे म्हणून घरात आलेले सदस्यांना त्यांची आठवण बिग बॉसच्या घरात सोडण्यासाठी त्यांना एक गिफ्ट देते. घराच्या गार्डनमध्ये पिओपीचे चौकोन ठेवले जात पाहुण्यांना त्यांच्या हाताचा छाप आणि स्वाक्षरी करण्यास सांगतात. यावेळी घरातील पाहुणे म्हणून आलेल्या सदस्यांच्या भावना उफाळून येताना दिसतात. त्यानंतर घरातील पाहुण्यांची घरातून एक्झिट होते. घरातील सदस्यांना आता फिनालेच्या ट्रॉफिकडे घेऊन जाण्यासाठी अवघे काही तासच राहिले आहेत. तर उद्या बिग बॉस फिनालेचा एपिसोड संध्याकाळी 7 वाजल्यापासून कलर्स मराठीवर प्रक्षेपित केला जाणार आहे. त्यामुळे यंदा बिग बॉस मराठी 2 चा विजेता कोण होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.