Aapla Marathi Bigg Boss Season 2 | (Photo Credits: Twitter)

Bigg Boss Marathi 2, 5th June 2019, Day 10 Episode Updates: बिग बॉस घरातील नववा दिवस फारच कंटाळवाणा ठरला. दहाव्या दिवशी थोडीशी गंमत आली इतकेच. बिग बॉस स्पर्धकांना चोर बाजार हा टास्क देण्यात आला होता. नवव्या दिवशी चोरबाजार टास्क सगळे स्पर्धक आपापल्या पद्धतीने खेळत होते. पण, त्यातल्या काहीच जणांना टास्क कळला होता. तर बरेच जण गोंधळले होते. काय चोरायचं आणि काय नाही चोरायचं. कोणाच्या कोणत्या गोष्टी चारायच्या याबाबतही चोरांमध्ये एकमत नव्हते. तर, दुकानदारांना हे साहित्य विकण्याचा चोरांचा प्रकार म्हणजे सरळ सरळ ब्लॅकमेलींग होते. त्यात पोलिसांना त्यांच्या रोलच समजला नव्हता. असे काहीसा प्रकार होता.

काय होता चोर बाजार टास्क?

चोरबाजार टास्कमध्ये स्पर्धकांचे तीन गट तयार करण्यात आले होते. क्रमांक एक पोलीस, क्रमांक दोन चोर आणि क्रमांक तीन चोरांना पोलीस आणि दुकानदारांचे सामान चोरायचे आहे. आणि ते दुकानदारांशी व्यवहार करुन विकायचे आहे. जे सामान विकत घेतले जाणार नाही ते थेट स्टोअर रुममधून कायमस्वरुपी बाहेर जाणार आहे. जे स्पर्धकाला परत मिळणार नाही.

किशोरी शहाणे विज आणि बिचुकले यांच्या संवादामुळे मर्यादीत रंगत

चोर बाजार टास्क थांबल्यावर किशोरी शहाणे यांना आपल्या वस्तू अस्ताव्यस्त विस्कटलेल्या पाहून चांगल्याच दु:खी झाल्या. त्या सतत रडत होत्या. यात आपल्या टीममधील इतर सहकाऱ्यांसोबत रचलेले नाटकही होते. पण, अभिनयाच्या पातळीवर ते आश्रू खरे वाटत होते. त्या एकट्या बसल्या असताना अभिजित बिचुकले यांनी त्यांच्यासोबत साधलेला काहीसा भावनिक आणि बराचसा मजेशीर संवाद मर्यादित अर्थाने रंगवत वाढवून गेला.  (हेही वाचा, Bigg Boss Marathi 2 Day 10 Episode Preview: ...आणि किशोरी शहाणे ढसाढसा रडल्या, जाणून घ्या वादाचं कारण)

रुपाली घेणार बिचुकलेची विकेट

चोर बाजार टास्क सध्या तरी संपला असला तरी, दुसऱ्या टीमचा हा टास्क उद्या सुरु होत आहे. त्यामुळे या टास्कमध्ये उद्या चोराची भूमिका बजावणाऱ्या मंडळींनी आतापासूनच गळ टाकायला सुरुवात केली आहे. रुपाली हिने अभिजित बिचुकले यांना कोपऱ्यात घेऊन काहीसे भावनिक करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी नाटकी आश्रुही आणले बिचुकले यांनीही भोळेपणा दाखवत बऱ्याच गोष्टी बरळले. पण, हे सगळा बनाव प्रत्यक्षा उतरणार का हे उद्याच्या भागातच कळणार आहे.