Bigg Boss Marathi 2, 3rd June 2019, Day 9 Episode Updates | (संग्रहित संपादित प्रतिमा)

Bigg Boss Marathi 2, Episode 9 Highlights: कसं काय पाटील बरं हाय का? गाण्याने बिग बॉस च्या घारातील स्पर्धकांची आठव्या दिवसाची सुरुवात झाली. किशोरी शहाने विज यांनी फॅमेली फोटो सोबत मारलेल्या गप्पा आणि त्या आधी घरातील स्पर्धकांनी आपापली टीम तयार करण्याबाबत आपापसात केलेली सल्लामसलत या गोष्टी अगदी शांततेत पार पडला. त्यानंतर पराग करंदिकर आणि रुपाली भोसले यांच्यात झालेली मलमपट्टीही काही वेळ चर्चेचा विषय ठरली होती. मात्र खरी रंगत आणली ती वीणा जगताप आणि विद्याधर जोशी उर्फ बाप्पा यांच्यातील भांडण. आणि या भांडणाचे कारण ठरली अभिजित बिचुकले यांची पँट.

किशोरी शहाणे विज यांच्या मध्यस्थीने हे भांडण सुटलं खरं. पण, विद्याधर आणि वीणा यांच्यातील खडाजंगी मात्र कारणाशिवाय असल्याची थोड्याच वेळात पुढे आले. सर्वच सदस्य समजदार असल्याचे सध्यास्थितीत तरी दिसत असल्याने हा वाद पुढे वाढला नाही. (हेही वाचा, Aapla Marathi Bigg Boss Season 2: अभिजित बिचुकले हे महेश मांजरेकर यांच्या सल्लाने आव्हानांचा सामना करणार का?)

दरम्यान, बिग बॉसच्या आदेशाने अभिजित बिचुकले यांना आपल्या टीममधील एक सदस्य टीम वैशालीमध्ये पाठवायचा होता. हा सदस्य कोण असावा याबाबत बिचुकले यांच्यासमोर आव्हाण होते. टीमध्ये बराच खल झाला. अखेर किशोरी शहाणे यांच्या खास यांनी खास डोल्यालिटी लडवून काही खेळ्या केल्या आणि अखेर अभिजित बिचकुले यांच्या संमतीने मैथिलीला वैशालीच्या टीममध्ये पाठवले.

नॉमिनेशनवरुन खुन्नस वाढण्याची शक्यता

बिगबॉसने नॉमिनेशन टास्क दिला आहे. यात प्रत्येक सदस्याच्या हातात एक पोपट होता आणि या पोपटावर स्पर्धकाचे नाव होते. अट अशी होती की, किमान सहा स्पर्धक नॉमिनेट व्हावेत. त्यामुळे अनेकांनी एकमेकांना नॉमिनेट करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. यात काहींना यश आले तर काहींना अपयश. काही सुरक्षित राहिले तर, काही नॉमिनेट झाले. हा टास्क करताना  अभिजित बिचुकले यांनी पराग करंदीकर यांना नॉमिनेट केले.  विणाने मधवला नॉमिनेट केले. माधवणे विणाला नॉमिनेट केले. विणा आणि मैथिली यांच्यात नॉमिनेशनवर पहिला भडका उडाला.

स्पर्धकांना मिळाला चोर बाजारचा टास्क

दरम्यान, बिग बॉसने स्पर्धकांना पुढील टास्क चोर बाजार दिला आहे. आता पाहुयात चोर बाजारमध्ये कोण यशस्वी ठरतंय आणि कोणाला दणका बसतोय!