बिग बॉसचा खेळ आता उत्तर्धाच्या दिशेने जात आहे. तर बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकले यांच्या एन्ट्रीमुळे घरात पुन्हा एकदा खेळीमेळीचे वातावरण तयार झाले आहे. तर या आठवड्याच्या कप्तानपदासाठी अभिजित आणि आरोह यांच्यामध्ये टास्क खेळवण्यात आला. तहानलेला कावळा या टास्कदरम्यान अभिजतचे मटके प्रथम पाण्याने भरले. मात्र शिवानीने टास्कदरम्यान आरोहच्या टीममधील वीणा हिने स्वत:च्या स्वार्थासाठी विरुद्ध टीममधील अभिजीतच्या मटक्यात खडे टाकल्याचा आरोप केला. तर टास्क संपल्यानंतर वीणा आणि शिव यांनी टास्कसाठी देण्यात आलेले खडे वापरुन एकमेकांच्या भावना व्यक्त केल्याचे दिसून आले.
मात्र टास्कदरम्यान घडलेल्या कृत्यावरील आरोपाचे कारण बिग बॉस घरातील सदस्यांना स्पष्ट करण्यास सांगतात. यावरुन शिवानी हिने वीणाने टास्कदरम्यान केलेल्या कृत्याबद्दल तिचे मत व्यक्त केले. मात्र वीणा हिने शिवानीने तिच्यावर लावलेले आरोप खोडून लावले. यावरुन वीणा आणि नेहा मध्ये खटके उडताना दिसून आले. तसेच या वादामध्ये अभिजित आणि आरोह यांच्यामध्ये सुद्धा आरोपप्रत्यारोप सुरु झाले. मात्र नेहा हिने सुरु असलेले वाद आपण मिटवू असे सांगते तरीही सदस्यांमध्ये नेहमीप्रमाणेच एकमेकांबद्दल राग व्यक्त झालेला दिसला. अद्याप कप्तानपदासाठी देण्यात आलेले कार्य पूर्ण न झाल्याचे सांगत सदस्य फक्त टास्कदरम्यान पकडापकडी खेळत असल्याचे दिसून आल्याचे बिग बॉसने सुनावले.
तर कार्यासाठी देण्यात आलेल्या सामग्रीचा उपयोग फक्त तेव्हाच करायचा होता. मात्र शिव आणि वीणा यांनी त्या खड्यांचा वापर वैयक्तिक भावनांसाठी उपयोग केल्याचे म्हणत सर्वत्र पसरलेले खडे पुन्हा पुर्नाव्यस्थेत ठेवण्यास सांगतात. या दोघांना बिग बॉसने सुनावण्यात आलेल्या शिक्षिचे निरिक्षण अभिजित बिचुकले करताना दिसून आले. तर शिक्षा पूर्ण झाल्यावर वीणा आणि शिवने कॅमेऱ्यासोबत आपल्या चुकीबद्दल बिग बॉसची क्षमा मागताना दिसले.(Bigg Boss Marathi 2, 30 July, Episode 66 Preview: एकमेकांविषयीच्या भावना व्यक्त करणे शिव-वीणाला पडले महागात, बिग बॉसने दिली ही शिक्षा)
बिग बॉसने दिलेल्या आदेशानुसार टास्कसाठी पुन्हा एकदा सदस्यांमध्ये सुरुवात झाली. मात्र त्यावेळी एकमेकांच्या पाण्यातील खडे कमी होता कामा नये असे बिग बॉसने सांगितले. त्यानुसार टास्क सुरु झाला. त्यावेळी आरोहच्या टीममधील नेहा आणि अभिजितच्या टीममधील हिनामध्ये बळाचा वापर करताना दिसून आले. तर वीणा आणि रुपाली यांच्यामध्ये एका साध्या पळीवरुन खटके उडाले. तर कप्तानपदासाठी देण्यात आलेल्या टास्कमध्ये अभिजितला बिग बॉसने विजयी ठरवल्यानंतर त्याला कप्तनापदी निवड करण्यात आली असल्याचे घोषित केले.
कप्तनपदाचा भार स्विकारल्यानंतर अभिजित केळर याने अभिजित बिचुकले यांना बाथरुम साफ करण्याचे काम सोपवले. मात्र बिचुकले यांनी मी हे काम करणार नाही असे स्पष्टपणे उत्तर दिले. 'सारी दुनिया का बोझ हम उठाते है' अशा नावाचे नॉमिनेशचे कार्य देऊ करतात. तर नेहाला माधव याने सेफ केल्यामुळे ती नॉमिनेशच्या प्रक्रियेपासून वाचली आहे. तसेच अभिजीत केळकर या आठवड्याचा कप्तान असल्यामुळे तो सुद्धा नॉमिनेशनच्या प्रक्रियेत नसणार आहे. तर शिव, शिवानी, किशोरी सेफ असून नॉमिनेशमध्ये वीणा, रुपाली, हिना, आरोह आणि अभिजित बिचुकले यांचे नाव देण्यात आले आहे.