Bigg Boss Marathi 2 Preview 66 (Photo Credits: Twitter)

Bigg Boss Marathi 2: काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरातून बाहेर गेलेलं वादळं म्हणजे खुद्द कविमनाचे अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale)  यांची पुन्हा एकदा घरात एन्ट्री झाल्यानंतर आता या घराला आणि घरातील स्पर्धकांना एक वेगळंच वळण लागलय. त्यात बिचुकलेंचे जरी या घरातील स्थान निश्चित झाले नसले तरीही बिचुकलेंनी शिवानी सुर्वेशी (Shivani Surve) बातचीत करुन आपल्या Strategy खेळायला सुरुवात केली आहे. आता ते घरात परतल्या नंतर आजच्या भागात स्पर्धकांना एक नवीन टास्क देण्यात आला आहे, ज्याचे नाव 'तहानलेला कावळा'. या टास्कदरम्यान शिव ठाकरे (Shiv Thakre) आणि वीणा जगताप (Veena Jagtap) यांनी टास्कसाठी दिलेल्या सामग्रीचा वापर आपल्या वैयक्तिक भावना व्यक्त करण्यासाठी केला. त्यामुळे त्या दोघांना बिग बॉस ने कडक शासन केलेले आज पाहायला मिळणार आहे.

बिग बॉस ने दिलेल्या तहानलेला कावळा टास्कसाठी जी सामग्री दिली होती त्याचा वापर शिव आणि वीणा यांनी आपल्या एकमेकांविषयीच्या भावन व्यक्त करण्यासाठी केला. त्यावेळी बिग बॉस ने दिली ही शिक्षा, पाहा व्हिडिओ

हेही वाचा- Bigg Boss Marathi 2, 29 July, Episode 65 Update: बिग बॉसच्या घरात पाहुणे म्हणून अभिजित बिचुकले यांची एन्ट्री, माधवच्या जाण्याने नेहाच्या डोळ्यात पाणी

तर दुसरीकडे या टास्कदरम्यान शिवानी सुर्वे ने वीणा जगताप हिला धोकेबाज असे उल्लेखले आहे. तिने टास्क दरम्यान आपल्या विरुद्ध टीमला चोरून मदत केल्याचे शिवानीचे म्हणणे आहे. त्यामुळे नक्की या दोघींत काय तूतू-मैंमै होणार तर शिव-वीणाला दिलेली शिक्षा हे दोघे पूर्ण करणार का हे पाहण्यासाठी आजचा बिग बॉस मराठी चा एपिसोड अवश्य बघा.