
Bigg Boss Marathi 2 Day 25 Episode: बिग बॉस मराठी 2 च्या आजच्या भागातही बिग बॉसने सोपवलेले धोबीपछाड हे साप्ताहिक कार्य सुरु होते. या कार्याच्या पहिल्या फेरीत कोणत्याही टीमला ठरवून दिलेली कपड्यांची ऑर्डर पूर्ण न करता आल्याने कोणतीच टीम विजयी ठरली नाही. मात्र त्यानंतर टीम ए कडे पावडरची दोन पॅकेट्स सापडल्याने एकच गदारोळ झाला. याउलट टीम ए मधील सदस्यांनी संचालिका चिटींग केल्याचा आणि पार्शल असल्याचा आरोप केला. त्यामुळे यात बिग बॉसने निर्णय द्यावा अशी विनंती नेहाने केली. (बिग बॉसच्या घरातील ग्लॅमडॉल हीना पांचाळ साठी अभिजित बिचुकले यांनी गायले 'हे' गाणे; पहा व्हिडिओ)
धोबीपछाड कार्यात कार्य पूर्ण न केल्याची जबाबदारी मॅनेजरने स्वीकारावी असे बिग बॉसकडून सांगण्यात आले. तर आधीचे मॅनेजर बरखास्त करुन नवे मॅनेजर बिग बॉसने नेमले. यात टीम ए साठी मॅनेजर म्हणून परागची निवड करण्यात आली. तर टीम बीची मॅनेजर वीणा ठरली. तसंच हे कार्य पूर्ण साम दाम दंड भेद या युक्तीचा चातुर्याने वापर करण्याचे आदेश बिग बॉसकडून देण्यात आले.
यानंतर कार्याच्या दुसऱ्या राऊंडसाठी पराग आणि वीणामध्ये डील झाल्याने टीम ए कडून 1 कपडा देऊन टीम बी ने 5 कपड्यांची ऑर्डर पूर्ण करत दुसऱ्या राऊंडमध्ये टीम बी विजयी ठरते.
आजच्या भागाचे विशेष आकर्षण ठरतं ते म्हणजे बिचुकले यांनी हीनासाठी गायलेली गाणी. माने या ना माने तू मेरी हो गई', 'कोरा कागज़ था ये दिल मेरा' आणि 'तुम्हे अपना बनाने की कसम खाई है' ही गाणी बिचुकले हीनासाठी गातात. यात घरातील मंडळीही चांगलीच मज्जा घेतात.
तर खरी मज्जा येते ती तिसरा राऊंड सुरु झाल्यानंतर. टीम बी मॅनेजर सुट्टीवर गेल्याचे घोषित करते. टीम बी ला कपडेही कमी मिळतात. त्यामुळे साम दाम दंड भेद या युक्तीचा वापर करायचे टीम बी ठरवते. आणि मग टीम ए चे कपडे, इस्त्री चोरी करणे असे प्रकार होऊ लागतात. दोन्ही टीममध्ये वाद, टोमणे मारणे असे प्रकार घडतात. साम दाम दंड भेद चे नारे दिले जातात. यात शिव आणि पराग पुढे असतात. यात परागला थोडासा त्रासही होतो.
त्यामुळे आता या कार्यात पुढे नक्की काय होणार? साम दाम दंड भेद ही युक्ती चातुर्याने वापरण्यात दोन्ही टीम यशस्वी ठरणार का? का यातून पुढे वेगळंच काही निष्पन्न होणार, हे पाहणे प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.