Bigg Boss Marathi 2, 19 June, Episode 25 Updates: बिग बॉस च्या घरात आज रंगला 'धोबीपछाड'चा डाव; कोणती टीम ठरणार सरस?
Bigg Boss Marathi 2 (Photo Credits-Twitter)

Bigg Boss Marathi 2 Day 24 Episode: बिग बॉस मराठी 2 च्या घरात आज सर्व सदस्यांवर 'धोबीपछाड' हे साप्ताहिक कार्य सोपवण्यात आले. यात दोन टीममध्ये सदस्यांची विभागणी करण्यात आली तर या कार्यात वैशाली माडे संचालिका होती. दोन्ही टीमसाठी मॅनेजर नेमण्याची जबाबदारी टीम मेंबर्सवर सोपवण्यात आली होती. त्यानुसार टीम ए मध्ये माधव, हिना, पराग, अभिजीत बिचुकले, सुरेखा ताई हे सदस्य होते आणि मॅनेजर म्हणून नेहा शितोळे हिची नेमणूक करण्यात आली होती. तर टीम बी चे मॅनेजर बाप्पा म्हणजे विद्याधर जोशी होते आणि वीणा, रुपाली, किशोरी, अभिजीत केळकर, शिव हे टीमचे सदस्य होते.

धोबीपछाड या कार्यात मिळालेले कपडे धुवून, वाळवून, इस्त्री करुन नंतर समोरच्या मॅनेजरकडून अप्रुव्ह करुन घ्यायचे होते. धोबीपछाड कार्य पार पडताना बिग बॉसच्या घरात रंगला आरोप प्रत्यारोपाचा खेळ (Watch Video)

दोन्ही टीम्सने बझर होताच धोबीपछाड कार्याला सुरुवात केली. यात दोन्ही टीममध्ये हलके-फुलवे आरोप-प्रत्यारोप होताना दिसले. कधी घरातील वस्तू वापरल्यामुळे तर कधी पंख्याने कपडे सुखवल्यामुळे वाद झाले. तर मध्येच बिग बॉसने विद्याधर जोशी आणि पराग याला कन्फेशन रुममध्ये बोलून काही गोष्टी सांगितल्या. त्यानंतर बाहेर आल्यावर नेहाकडील मॅनेजरचा टॅग घेऊन परागने आपल्या शर्टाला लावला. यावर टीम ए सह संचालिकेनेही आपेक्ष घेतला. तर टीम बी मध्ये देखील काहीसे मतभेत होताना दिसले. मात्र अखेर पुन्हा मॅनेजरचा टॅग नेहाकडे गेला.

या कार्यात टीम ए चे 4 पैकी 2 तर टीम बी चे 5 पैकी 1 इतके कपडे अप्रुव्ह झाले. मात्र टीम ए चा सदस्य असलेला पराग आतून कपडे आणत असल्याचा संशय टीम बी आला. याची माहिती त्यांनी संचालिका वैशाली माडे हिला दिली. त्यामुळे आता हा वाद कुठे पर्यंत जाणार आणि उद्याच्या भागात नेमकं काय होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे काल झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये रुपाली आणि बिचुकले यांच्यातील जोरदार वाद आपण पाहिला. मात्र आज दोघांनीही एकमेकांची माफी मागितली.