बिग बॉस मराठी 2 मध्ये आज घरातील सदस्यांवर धोबीपछाड कार्य सोपवले आहे. हे कार्य पार पाडताना देखील सदस्यांमध्ये वादावादी होताना दिसत आहे. या आरोप-प्रत्यारोपांच्या खेळात थेट संचालिकेवर आरोप करण्यात येत आहेत. काल झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्येही घरात चांगलाच वाद रंगला. त्यानंतर आज नवा वाद समोर येत आहे.
आजच्या धोबीपछाड टास्क पार पाडत असताना नेहा शितोळे आणि कॅप्टन वैशाली माडे यांच्यात वाद रंगला. ('शेरास सव्वा शेर' टास्कमध्ये जोरदार वादावादी; वीणा जगताप, पराग कान्हेरे, विद्याधर जोशी, सुरेखा पुणेकर आणि अभिजीत बिचुकले झाले नॉमिनेट)
पहा व्हिडिओ:
बिग बॉसने दिलेलं धोबीपछाड कार्य पार पडताना सुरू झाला आरोप प्रत्यारोपाचा खेळ. घरातल्यांनी केला संचालिकेवरच आरोप. पाहा #BiggBossMarathi2 आज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर.@officialveenie @vaishalimhade @ShitoleNeha @AbhijeetNKelkar @maadhavdeochake pic.twitter.com/gcZbBvfJSW
— Colors Marathi (@ColorsMarathi) June 19, 2019
काल झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये जोरदार वादावादीनंतर वीणा जगताप, पराग कान्हेरे, विद्याधर जोशी, सुरेखा पुणेकर आणि अभिजीत बिचुकले नॉमिनेट झाले. तर शिव याला यापूर्वीच सर्वानुमते नॉमिनेट करण्यात आले होते.