बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi 2) घरातील वाद बाजूला सारल्यास हे एकापेक्षा एक अवलिया सदस्य अनेकदा चेष्टामस्करी करताना पाहायला मिळतात. आजच्या भागातही सुरुवातीला शिव, वीणा, शिवानी हे सदस्य अभिजित बिचुकले यांची फिरकी घेताना पाहायला मिळणार आहेत. तर दुसरीकडे शिवानी आणि नेहा मध्ये पुन्हा एकदा वादाला तोंड फुटणार आहे. या दोन्ही प्रसंगामुळे घरात एकाच दिवशी सदस्यांचे हसरे आणि संतापलेले चेहरे बघायला मिळणार आहेत.दरम्यान कालच्या भागात खांब खांब या टास्क दरम्यान संचालकाच्या भूमिकेतील हिनाचा गोंधळही बिग बॉस सर्वांसमोर स्पष्ट करणार आहेत.
पाहा आजच्या भागात काय घडणार?
#BiggBossMarathi2 च्या घरात एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असलेल्या शिवानी आणि नेहाचा वाद गेला विकोपाला. पाहा #BiggBossMarathi2 आज रात्री 9:30 वा. #ColorsMarathi वर. @imsurveshivani @Nehashitolefc1 @GmKishori pic.twitter.com/dtEGQiJO72
— Colors Marathi (@ColorsMarathi) August 6, 2019
अभिजीत बिचुकलेंची घरच्यांनी घेतली मजा. पाहा #BiggBossMarathi2 आज रात्री 9:30 वा. #ColorsMarathi वर. @imsurveshivani @officialveenie @abhijeetkellkar @shivthakare_ @ArohWelankar pic.twitter.com/iVNi6DDhhE
— Colors Marathi (@ColorsMarathi) August 6, 2019
आजच्या भागाच्या सुरुवातीलाच अभिजित बिचुकले यांना शिव वीणा आणि शिवानी टार्गेट करतात. बिचुकले आंघोळीसाठी बाथरूममहदये गेले असताना शिव लाईट चालू बंद करून बिचूकलेंना सतावत असतो. खरतर घरात पुन्हा एंट्री करतानाच शब्दांचे हत्यार उपसून आलेले बिचुकले एरवी असे घडले असता संतापण्याचे शक्यता अधिक होती. मात्र आज ते संयमाने घेत शीवच्या मस्करीत सहभागी होतात. हो पण यावेळेचे बिचुकलेची इंग्रजीची संवाद ऐकून कोणालाही हसू आवरणार नाही हे निश्चित. हा सगळं प्रकार घडत असताना शिवानी आणि वीणा तर अक्षरशः लोटपोट होऊन हसत असतात. हा प्रकार संपतो तोवरच शिवानी आणि नेहा मध्ये काहीश्या कारणावरून वाद सुरु होतात. शिवानी नेहावर माधवला घराबाहेर काढल्याचा आरोप लगावत जबाबदार धरते.
वास्तविकता, शिवानी, नेहा आणि माधव हे घरातले सर्वात तगडे त्रिकुट म्हणून ओळखले जायचे, मात्र माधव घराबाहेर पडायच्या एक आठवड्यापासून त्यांच्यातही वाद होत होते. आजच्या भागात शिवानी हे जुने वाद पुन्हा उकरून काढत नेहाला सुनावते. नेहा सतत व्हिक्टीम कार्ड खेळत असल्याने प्रेक्षकांना शिवानी आणि माधव हे वाईट होते आणि त्यामुळेच माधवला घराबाहेर जावे लागले असा आरोपही शिवानी नेहावर करते. या भांडणांत सुरुवातीला किशोरी मध्यस्थी करत असतात मात्र भांडण वाढत गेल्यावर त्यादेखील बाजूला होतात. या भांडणामुळे आता घरातील जीवाभावाच्या मैत्रिणी म्हणजेच शिवाने आणि नेहा मध्ये कायमची फूट पडतेय का हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा भाग पाहावा लागेल.