Bigg Boss Marathi 2 Preview: श्रावणाची सुरुवात होताच त्याची हलकी झलक बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi 2) घरात देखील पाहायला मिळत आहे. कधी हसून तर कधी ढासू बनून घरातील सदस्य आता शेवटचे काही आठवडे घरात मजा करत आहेत. कालच्या भागात रुपाली भोसले (Rupali Bhosale) घराबाहेर पडल्याने आता घरात टॉप 9 सदस्य उरले आहेत. आजच्या भागाच्या सुरुवातीला हे सदस्य एकत्र जमून आपण इथवर पोहचलो आहोत याचा आनंद डान्स करून साजरा करतात. मधोमध फुलांच्या पाकळ्यांनी सजवलेला लिव्हिंग एरिया आणि त्यात घरातील सदस्यांचा हसण्याचा आवाज हा दुर्मिळ योग आज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण हा आनंद फार काळ न टिकता दुसऱ्या दिवशी लगेचच सदस्यांना आठवड्याचे कॅप्टनशिप टास्क सोपवण्यात येते. या आठवड्यात घरात खांब खांब हे टास्क पार पडणार आहे. ज्यादरम्यान आरोह (Aroh Velankar) आणि शिव (Shiv Thackrey) यांच्यात पुन्हा एकदा खडाजंगी होणार आहे. VOOT वर दाखवण्यात येणाऱ्या प्रोमोमध्ये तुम्ही आजच्या भागाची झलक पाहू शकता.
आजच्या भागात बिग बॉसच्या घरातील सदस्यांना सोपवण्यात आलेल्या खांब खांब या टास्क मध्ये सुरुवातीला सर्वांना एका चौकटीत उभे केले जाते. सायरन वाजल्यावर या सदस्यांनी घरात लावलेले खांब पकडून त्यावर आपल्या नावाचे स्टिकर लावायचे असते. रुपालीने घरातून बाहेर झाल्यावर आपल्याला दिलेल्या खास पॉवरचा वापर करुन हीनाला या आठवड्यासाठी सुरक्षित केले आहे यामुळे ती टास्क दरम्यान ती संचालकाच्या भूमिकेत दिसत आहे. या टास्क मध्ये कोण आधी खांब पाकसुन त्यावर आपल्या नावाचे स्टिकर लावेल हे पाहायचे असल्याने त्या धावाधावीत शिव आणि आरोह मध्ये वाद शकतात. नेहमीप्रमाणे या ही टास्क बद्दल सदस्यांच्या मनात काही संशय आहेत.
आजच्या भागाची झलक
#BiggBossMarathi2 च्या घरात सुरू झालेल्या खांब-खांब या कॅप्टन्सी टास्कमध्ये कोणाचे पडणार खांब आणि कोणाचं टिकणार स्थान?
पाहा #BiggBossMarathi2 आज रात्री 9:30 वा. #ColorsMarathi वर. @imsurveshivani @officialveenie @TheHeenaPanchal @ArohWelankar @Nehashitolefc1 @GmKishori pic.twitter.com/MNUnRcqewS
— Colors Marathi (@ColorsMarathi) August 5, 2019
दरम्यान, या आधीच्या आठवड्यात अभिजित केळकर हा घराचा कॅप्टन होता. कॅप्टन्सी सोबत येणारी एका आठवड्याची सुरक्षा हे घरातील सदस्यांसाठी खरोखरच जादुई समाधान असते त्यामुळे या कॅप्टन्सी च्या स्पर्धेत सर्वच सदस्य जीव तोडून खेळताना पाहायला मिळू शकतात. बिग बॉसच्या घरात आता शेवटचे साधारण चार आठवडे शिल्लक आहेत यामध्ये सदस्य काय काय धम्माल करतात हे जौणून घेण्यासाठी पाहत राहा आपला मराट्टही बिग बॉस सीझन 2!