सलमान खान (Photo Credits: Instgaram)

सध्या चाहते ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) ची आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत. यंदाच्या सिझनमध्ये नक्की कोण कोण सामील होईल याबाबत वेगवेगळे अनुमान लावले जात आहेत. त्याचबरोबर सलमान खानला (Salman Khan) होस्ट म्हणून पाहण्यासही त्याचे चाहते उत्साहित आहेत. सलमान खानने या शोचे 10 सीझन होस्ट केले आहेत व कदाचित ज्या पद्धतीने तो हा शो होस्ट करतो त्याची जागा इतर कोणी घेऊ शकणार नाही. सलमानचे होस्टिंग हे या शोच्या वाढत्या टीआरपीमध्ये महत्वाची भूमिका बजावते. आता मिळालेल्या माहितीनुसार या शो साठी सलमानसोबतची डील फायनल झाली असून, मेकर्स सलमान खानला यंदा प्रत्येक एपिसोडसाठी तब्बल 20 कोटी देण्यास तयार झाले आहेत.

बिग बॉस हा शो साधारण तीन महिने चालतो, मागच्या सिझनला मिळालेली लोकप्रियता पाहता तो अजून वाढवण्यात आला होता. आता सलमान खानची यंदाच्या सिझनची तीन महिन्यांची फी 480 कोटी आहे. परंतु एका स्रोताच्या मते, चॅनल आणि सलमानच्या टीमने 450 कोटींवर हा करार अंतिम केला. बिग बॉस 13 साठी सलमान खानने प्रति एपिसोड 15.5 कोटी रुपये घेतले होते, परंतु यावर्षी ‘दबंग खान’ने आपली फी वाढविली आहे. (हेही वाचा: सौम्या टंडन उर्फ अनीता भाभी दिसणार 'बिग बॉस 14' च्या सीझनमध्ये? जाणून घ्या Viral बातमी मागील सत्यता)

सूत्रानुसार 450 कोटी या फीमध्ये शोचे प्रोमो आणि व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्सची फी इत्यादींचा समावेश आहे. सलमानला ही फी देण्यास एंडेमॉल तयार आहे कारण सलमानमुळेच हा कार्यक्रम टीआरपीमध्ये अव्वल राहतो हे त्यांना माहित आहे. दरम्यान, आता सलमान खान आपला शनिवार शोच्या शूटिंगसाठी गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये घालवेल. तिथे त्याच्यासाठी एका मस्त सेट बनवला जात आहे. लोकप्रियतेमुळे बिग बॉस 13 मध्ये पाच आठवड्यांचा विस्तार पाहिला गेला होता. मागील हंगाम हा टीआरपी चार्टवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर होता.