Bigg Boss 14: सौम्या टंडन उर्फ अनीता भाभी दिसणार 'बिग बॉस 14' च्या सीझनमध्ये? जाणून घ्या Viral बातमी मागील सत्यता
Saumya Tandon is Not Entering Bigg Boss 14 House: सलमान खान (Salman Khan) याचा टीव्ही शो 'बिग बॉस 14' च्या सीझन बद्दल सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. याच दरम्यान सीझन 14 मध्ये बिग बॉसच्या घरात कोण एन्ट्री करु शकतात अशा सेलिब्रेटिंची नावे सुद्धा समोर येत आहेत. परंतु आता टीवी शो भाभी जी घर पर है मधील अनीत भाभी उर्फ सौम्या टंडन संबंधित एक बातमी समोर आली आहे. त्यात असे म्हटले जात आहे की, सौम्या टंडन बिग बॉसच्या घरात एन्ट्री करु शकते. या संबंधित मीडियात बातम्या सुद्धा व्हायरल झाल्यानंतर तिने एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे.
सौम्या टंडन हिने इन्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत असे म्हटले आहे की, मी वारंवार स्पष्टीकरण देत आहे की बिग बॉग मध्ये माझ्या एन्ट्री संबंधित तर्कवितर्क लावणे आणि यावर लिहिणे थांबवा. मी बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार नाही आहे. या व्हिडिओत सौम्या अत्यंत मजेशीर अंदाजात आपल्या भावना व्यक्त करत ती बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.(Bigg Boss Marathi Season 3 Teaser: बिग बॉस मराठी सीझन 3 ची घोषणा; इथे पहा पहिली झलक Watch Video)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सलमानच्या या शो चा एक प्रोमो सुद्धा झळकवण्यात आला होता. त्यामध्ये सलमान खान सफाई करताना दिसून आला होता. आता प्रेक्षकांना बिग बॉगसच्या 14 व्या सीझनची आतुरता लागली आहे. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार हा शो एक महिना उशिराने प्रदर्शित केला जाणार असल्याचे म्हटले होते. तर ऑक्टोंबर महिन्यापासून हा शो सुरु होईल असा अंदाज बांधला जात आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2020 08:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

