Bigg Boss 13: सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांच्या लग्नाला घरच्यांची परवानगी; पहा काय म्हणाले Shehnaz Gill चे वडील (Video)
शहनाज गिलचे वडील, सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल (संग्रहित संपादित प्रतिमा)

हिंदी टेलीव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि वादग्रस्त शो म्हणून बिग बॉसकडे (Bigg Boss) पहिले जाते. सध्या या शोचे 13 वे पर्व चालू आहे. जेव्हा बिग बॉस 13 चे नाव येते, तेव्हा डोळ्यासमोर येतात भांडणे, वाद, मारहाण, शाब्दिक चकमकी. या सर्वांसोबत घरात काही सदस्यांमध्ये एक अनोखे नातेही फुलताना दिसत आहे.

रश्मी आणि अरहान, पारस आणि माहिरा यांची मैत्री, प्रेम काहीही म्हणा, जगजाहीर आहेच. आता सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) आणि शहनाज गिल (Shehnaz Gill) यांच्या जवळीकीची चर्चा सुरु आहे. महत्वाचे म्हणजे या दोघांचीही केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.

सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल हे दोघे एकमेकांचे खास मित्र आहेतच, सोबतच ते घरातील तगड्या स्पर्धकांपैकीही एक आहेत. आता सिद्धार्थ आणि शहनाज गिल यांचे प्रेमप्रकरण समोर येत आहे. दोघेही एकमेकांची खूप काळजी घेतात, सिद्धार्थ रागावल्यास फक्त शहनाज गिलच त्याला समजावू शकते, सिद्धार्थ शहनाजबाबत खूपच पझेसिव्ह आणि प्रोटेक्टीव्ह आहे. या दोघांच्या नात्याला सोशल मीडियावरही खूप पसंती मिळत आहे. आता चर्चा सुरु झाल्या आहेत त्या या दोघांच्या लग्नाच्या. अशात या दोघांच्या नात्यावर शहनाज गिलच्या वडिलांची प्रतिक्रिया आली आहे. (हेही वाचा: Bigg Boss 13 : माहिरा आणि पारसचा Kissing Video होत आहे व्हायरल)

शहनाजच्या वडिलांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते दोघांच्याही नात्याला आपली पसंती असल्याचे सांगत आहेत. ते म्हणतात, ‘त्यांची मैत्री चांगली आहे, दोघेही एकमेकांना कुठेतरी समजून घेत आहेत. जर या दोघांचा लव्ह अँगल सुरू झाला तर मग त्यांचा निर्णय असेल, याची मला काही हरकत नाही. यांना बाहेर येऊन लग्न करायचे असेल, तरी मला काहीच हरकत नाही. सिद्धार्थ एक समजूतदार माणूस आहे, आपल्या मतांवर तो ठाम आहे. त्याचा स्वभाव चांगला आहे त्यामुळे तो मलाही आवडतो.’ अशाप्रकारे शहनाज-सिद्धार्थच्या या नात्याला वडिलांची मान्यता मिळाली आहे.