Bigg Boss 13 Contestant List: सिद्धार्थ शुक्ला, रश्मि देसाई, कोयना मित्रा सह सलमान खानने 'बिग बॉस'च्या घरात केलं या 13 सेलिब्रिटी स्पर्धकांचं स्वागत
Asim Riaz, Ameesha Patel, Paras Chhabra (Photo Credits: Instagram)

Bigg Boss 13 Grand Premiere Episode Updates:  बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान (Salman Khan) आज (29 सप्टेंबर) दिवशी बिग बॉस (Bigg Boss) हिंदीचं 13 वं पर्व घेऊन पुन्हा रसिकांच्या भेटीला आहे. यंदा बिग बॉसच्या घरात 5 पुरूष आणि 8 महिला अशा एकूण 13 सदस्यांनी प्रवेश केला आहे. सिद्धार्थ शुक्ला, रश्मि देसाई, कोयना मित्रा, सिद्धार्थ डे, पारस छाबडा, अबु मलिक, असिम रियाज, माहिरा शर्मा, देवोलीना भट्टाचार्जी, शहनाज गिल, शेफाली बग्गा, दलजित कौर, आरती सिंह अशी या पर्वात आज सहभागी झालेल्या 13 केवळ सेलिब्रिटी स्पर्धकांची नावं आहेत. घरात स्पर्धकांची रवानगी करताच शोचा होस्ट सलमानने प्रत्येकाला टास्क आणि पार्टनर वाटून दिले आहेत.

पुढील 4 आठवड्यांचा काळ हा या घरातील पहिला महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या चार आठवड्यांनंतर एक फिनाले होईल. त्यासाठी घरातील मुलींना प्रेक्षकांच्या मतांसोबतच घरातील पुरूषांची साथ लागेल. तसेच मुलांनादेखील मुलींच्या पाठिब्याची गरज लागणार आहे. महिन्यभरात होणार्‍या पहिल्या फिनालेनंतर  हा शो संपणार नाही. बिग बॉस 13 यंदाही 3 महिन्यांचा असेल. पण जसजसा शो पुढे जाईल तसे यामध्ये काय ट्विस्ट आणि टर्न्स येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. यंदा 'फार्स्ट फॉर्वर्ड' थीमवर शो पुढे सरकणार आहे. यासोबतच बिग बॉस 13 अनेक कारणांनी यंदा वैशिष्ट्यपूर्ण आहे. बिग बॉस 13 मध्ये सलमान सोबत अभिनेत्री अमिषा पटेल को होस्ट आहे. .BIGG BOSS 13 : बिग बॉस शो होस्ट करण्यासाठी Salman Khan किती पैसे घेणार? रक्कम घ्या जाणून.

सोमवार ते शुक्रवार बिग बॉस 13 रसिकांना कलर्सवर रात्री 10.30 वाजता पाहता येणार आहे. तर विकेंडला सलमान खान रात्री 9 वाजता येणार आहे. आज ग्रॅन्ड प्रिमियरच्या एपिसोडमध्ये सलमान 'भारत' सिनेमातील 'स्लो मोशन' सिनेमातील गाण्यावर थिरकला.