Bigg Boss 12 च्या घरातून मेघा धाडे आणि जसलीन माथारू आऊट ?
मेघा धाडे, जसलीन मथारू (Photo Credits: Instagram and Twitter)

Bigg Boss 12 : बिग बॉसच्या घरातील मेघा धाडे (Megha Dhade) आणि जसलीन माथारू (Jasleen Matharu) या दोन स्पर्धकांचा प्रवास आज ( 7 डिसेंबर ) संपणार आहे. मीडिया रिपोर्ट्सद्वारा मिळालेल्या माहितीनुसार आज बिग बॉसच्या घरात Double Evictionचा धमाका होणार आहे. त्यामुळे Bigg Boss 12 च्या घरातील दोन खेळाडू घराबाहेर पडतील. मेघा आणि जसलीन या दोघींचाही बिग बॉसच्या घरातील प्रवेशापासून खेळातील सहभाग सतत चर्चेमध्ये होता.

जसलीन माथारू  ही लोकप्रिय भजन गायक अनुप जलोटा यांच्यासोबत बिग बॉसच्या घरामध्ये आली होती. सुरुवातीला गर्लफ़्रेंड अशी अनुप जलोटांनी जसलीनची ओळख करून दिली होती. मात्र हळूहळू घरातच त्यांचं नातं कमजोर झाल्याचे अनेक प्रसंग दिसून आले आहेत. अनुप जलोटा यापूर्वीच बिग बॉसच्या खेळातून आउट झाले आहेत. तर बिग बॉसच्या घरातून आऊट होणारी दुसरी स्पर्धक म्हणजे मेघा धाडे. मेघा धाडेने काही महिन्यांपूर्वीच बिग बॉस मराठीचं पाहिलं पर्व जिंकलं आहे. बिग बॉसच्या 12 च्या घरात मेघाची एंट्री वाईल्ड कार्डच्या स्वरूपात करण्यात आली होती.

आज विकेंडच्या डाव भागामध्ये मेघा आणि जसलीन घराबाहेर पडतील. सलमान खानसोबत या आठवड्याच्या रितेश देशमुख बिग बॉसमध्ये येणार आहे.