Bigg Boss 12 ची विजेती ठरलेल्या Dipika Kakar बद्दल काही खास गोष्टी!
Dipika Kakar (Photo Credit: File Image)

Bigg Boss 12: टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कड (Dipika Kakar) ही सलमान खानचा बहुचर्चित शो बिग बॉस 12 ची विजेती ठरली. यापूर्वी 'नागिन,' 'नच बलिए 8' आणि 'कयामत' यांसारख्या अनेक शोजमध्ये काम केले होते. या शो मधून दीपिकाने फक्त बिग बॉसची ट्रॉफी जिंकली नाही तर चाहत्यांच्या मनावरही राज्य केले. बिग बॉस या शोमधून घराघरात पोहचलेल्या दीपिका बद्दल जाणून घेऊया काही खास गोष्टी...

# 'ससुराल सिमर का' या मालिकेतून दीपिकाला ओळख मिळाली असली तरी यापूर्वी तिने 'पहले नीर भरे तेरे नैना देवी,' 'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो' या मालिकांमधून काम केले होते.

# दीपिकाने जेट एअरवेजमध्ये तीन वर्ष हवाई सुंदरी म्हणून काम केले आहे.

# दीपिकाचे वडील आर्मीमध्ये होते.

# दीपिकाचा जन्म 6 ऑगस्ट 1986 मध्ये झाला. तिला दोन बहिणी आहेत.

# दीपिकाने 5 रियालिटी शोजमध्ये काम केले होते.

# ससुराल सिमर का मालिकेतील को स्टार शोएब इब्राहिमसोबत दीपिका 2015 पासून रिलेशनशीपमध्ये होती. त्यानंतर 22 फेब्रुवारी 2018 ला इस्लाम धर्म स्वीकारत तिने शोएबसोबत निकाह केला.

# निकाहनंतर तिचे नाव 'फैजा' ठेवण्यात आले.

# 2010 मध्ये तिने टेलिव्हीजन इंडस्ट्रीत पर्दापण केले.

# दीपिकाने Paltan sadly या सिनेमातून बॉलिवूडमध्येही पर्दापण केले होते. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नाही. या सिनेमात अर्जुन रामपाल, सोनू सूद आणि जॅकी श्रॉफ हे कलाकार होते.

'बिग बॉस 12' ची विजेती ठरल्यानंतर दीपिकावर सर्वच स्तरातून, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.