Bigg Boss 13: भोजपुरी स्टार खेसारी लाल यादवची होणार बिग बॉस मध्ये एन्ट्री; असेल या पर्वातील पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक
Kesari Lal Yadav (Photo Credits: YouTube)

देशातील सर्वात लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस 13 (Bigg Boss) सध्या प्रचंड चर्चेत आहे. आतापर्यंत दलजीत कौर आणि कोयना मित्रा बिग बॉसच्या घरातून बेघर झाल्या आहेत. त्याचबरोबर रश्मी देसाई आणि माहिरा शर्मा या आठवड्यासाठी नॉमीनेट झाले आहेत. बिग बॉसच्या घरात अद्याप वाइल्ड कार्ड एंट्री झालेली नाही. 4 थ्या आठवड्यातील फिनालेनंतर ही वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. आता नक्की कोण घरात एन्ट्री घेणार याबाबत उत्सुकता आहे. वाईल्ड कार्ड एन्ट्रीसाठी बर्‍याच लोकांची नावे समोर आली आहेत त्यामध्ये भोजपुरी स्टार खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) याचे नाव आघाडीवर आहे.

खेसारी लाल यादव बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार आहे. या वृत्ताची पुष्टी त्याच्या प्रवक्त्यांनी केली आहे. सध्या तो लंडनमध्ये त्याच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. 28 ऑक्टोबरला मुंबईत आल्यानंतर तो सलमान खानच्या शोमध्ये एन्ट्री घेईल. प्रीमियर एपिसोडमध्येच खेसारी लाल यादव शोमध्ये एन्ट्री घेणार होता. परंतु इतर कामांमध्ये बिझी असल्याने त्याला ते करता आले नाही. खेसारी लाल याला 2012 मध्ये रिलीज झालेल्या 'साजन चले ससुराल' या चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळाली. यानंतर त्याने 'कुली नं. 1', 'छपरा एक्सप्रेस', 'जलवा' आणि 'दिलवाला' सारख्या बर्‍याच भोजपुरी चित्रपटांमध्ये कामे केली. (हेही वाचा: Bigg Boss 13 Protest: बिग बॉस 13 च्या 'Bed Friends Forever'या कन्सेप्टला करणी सेनेचा विरोध, सलमान खानच्या घराबाहेर घोषणाबाजी करणा-या 20 जणांना अटक)

दरम्यान, बिग बॉस 13ला लोकप्रियता मिळत असली तरी अजूनतरी हा शो टीआरपीमध्ये पहिल्या 10 मध्ये पोहचला नाही. खेसारी लालने शोमध्ये प्रवेश घेतल्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमधील प्रेक्षक या शोकडे अधिक आकर्षित होतील असा अंदाज बांधला जात आहे. आतापर्यंत भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमधील मनोज तिवारी, रवी किशन, मोनालिसा, सम्भव सेठ असे कलाकार बिग बॉसमध्ये सामील झाले आहेत. आता खेसारी लाल यादवची त्यात भर पडणार आहे.