भारती सिंह The Kapil Sharma Show सोडणार असल्याच्या चर्चेवर कृष्णा अभिषेक ने दिली प्रतिक्रीया; पहा काय म्हणाला
Krushna Abhishek, Bharti Singh and Haarsh Limbachiyaa (Photo Credit: Twitter)

कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचे पती हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) यांना ड्रग्स प्रकरणात एनसीबी कडून अटक करण्यात आली. तेव्हापासून भारती सिंह द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) सोडणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली होती. सोनी चॅनलने भारती सिंहला शो मधून काढून टाकले असून भारती सिंह ची शो मधून एक्सिक्ट होणार असल्याचे म्हटले जात होते. परंतु, कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) ने ही एक अफवा असल्याचे सांगत वृत्ताचे खंडन केले आहे. तसंच मी आणि कपिल, भारतीसोबत उभे असल्याचे त्याने म्हटले आहे.

एनसीबीने टाकलेल्या धाडीत भारती सिंह आणि त्यांचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला. त्यानंतर दोघांनाही एनसीबीकडून अटक करण्यात आली. अलिकडेच त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. त्यानंतर सोनी टीव्हीने भारती सिंहला शो मधून काढून टाकल्याच्या बातम्या वेगाने पसरु लागल्या. दरम्यान, कृष्णा अभिषेक ने बॉम्बे टाईम्स ला दिलेल्या मुलाखतीत काहीही झाले तरी कपिल आणि मी नेहमीच भारती सिंह सोबत असू, असे त्याने म्हटले आहे. काहीही झाले तरी मी भारतीला पाठींबा देईन. तिला कामावर परत यावेच लागेल. मी आणि कपिल, भारती सोबत आहोत. तिला माझ्याकडून पूर्ण पाठिंबा असेल. तसंच अद्याप चॅनलकडून असे कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. (Bharti Singh-Haarsh Limbachiyaa: भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्स प्रकरणी जामीन मंजूर)

भारती सिंह द कपिल शर्मा शो सोडणार असल्याची खूप चर्चा होती. यावर आता कीकू शारदा आणि कृष्णा अभिषेकची प्रतिक्रीया समोर आली आहे. कीकू शारदा यांनी सांगितले की, केवळ एक एपिसोड शूट करण्यासाठी भारती सिंह आली नाही आणि ते अत्यंत स्वाभाविक आहे. कारण प्रत्येक एपिसोडमध्ये भारतीचा रोल नसतो. ती शो सोडत असल्याची कोणतीही बातमी आमच्यापर्यंत आलेली नाही.