Bharti Singh-Haarsh Limbachiyaa: भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्स प्रकरणी जामीन मंजूर
भारती सिंह (Photo Credits: Twitter)

Bharti Singh-Haarsh Limbachiyaa: कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) यांना ड्रग्ज प्रकरणात मुंबईच्या कोर्टाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी पाठवलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष यांना आता जामीन मिळाला आहे. भारती आणि हर्ष यांनी एनडीपीएस न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. ज्यावर आज सुनावणी झाली. त्यानंतर एनडीपीएस कोर्टाने दोघांना सशर्त जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे भारती आणि हर्षला मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, शनिवारी 21 नोव्हेंबरला सकाळी एनसीबीच्या पथकाने भारती आणि हर्षच्या मुंबईच्या घरी आणि कार्यालयावर छापा टाकला. यावेळी एनसीबीला 86.5 ग्रॅम गांजा सापडला. यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने या दोन्ही कलाकारांविरोधात समन्स बजावून चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने चौकशीदरम्यान, भारती आणि हर्ष सोबत एका ड्रग पेडलरलाही बसवले होते. त्यानंतर भारती आणि हर्षने ड्रग्ज घेतल्याची कबूली दिली. (हेही वाचा - Amit Sadh: 'काई पो छे' स्टार अमित साध ने 4 वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न; मुलाखतीत मोठा खुलासा)

रविवारी मुंबईतील कोर्टाने भारती आणि हर्ष यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले होते. कोर्टाच्या आदेशानंतर हर्षला तळोजा तुरूंगात ठेवण्यात आले होते, तर भारती सिंहला कल्याण येथील कारागृहात ठेवण्यात आले होते.